Balli School Bus Accident: गेल्या महिन्यात बाळ्ळी येथे झालेल्या बालरथ स्कूल बसच्या अपघातातील बसचालकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकाला जामीन मंजूर कसा करण्यात आला, असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, 7 डिसेंबर 2023 रोजी सकाळी कुंकळ्ळीला विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना बालरथ बसचा अपघात झाला. यामध्ये 27 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले, तर 5 विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले होते.
बसचे स्टिअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याचे चालकाने सांगितले. मात्र चालक बेदरकारपणे भरधाव वेगात बस चालवत असल्याचे तपासात उघड झाले. यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी प्रभाकर वेळीप (46) या चालकाला भादंसंनुसार 279 आणि 337 कलमांतर्गत ताब्यात घेतले होते. मात्र त्याची आता जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
चालकाची सुटका केल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. दरम्यान, ज्यावेळी अपघात घडला तेव्हा पोलिसांनी या रस्त्याची पाहणी केल्यानंतर या रस्त्याच्या बाजूला क्रॅश बॅरियर्स बसविण्याची तातडीची गरज असल्याचे या विभागाने सार्वजानिक बांधकाम खात्याला पाठविलेल्या पत्रात म्हटले. अशाप्रकारचे अपघात घडल्यास प्राणहानी होण्याची शक्यता अधिक असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.