Balli Panchayat: 11 महिन्यांत 11 सचिवांची बदली, बाळ्ळी पंचायतीच्या कारभारावर विपरित परिणाम

Balli Panchayat Controversy: पंचायतीत गत ११ महिन्यांत ११ सचिवांची बदली झाली. आपल्या सरपंचपदाच्या कारकिर्दीतच चार सचिव झाले.
Balli Panchayat
Balli PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: पंचायतीत गत ११ महिन्यांत ११ सचिवांची बदली झाली. आपल्या सरपंचपदाच्या कारकिर्दीतच चार सचिव झाले. हे सचिव एक दिवस येतात नंतर त्यांची बदली केली जाते. त्यामुळे पंचायतीच्या कारभारावर विपरित परिणाम होत आहे, असे सरपंच हर्षद परीट यांनी सांगितले.

या सचिव बदलीचे पडसाद रविवारच्या ग्रामसभेत उमटले. गेल्या कित्येक ग्रामसभांच्या इतिवृत्तांना मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांनी रविवारची ग्रामसभा पुढे ढकलण्याचा आग्रह धरला व सरपंचांनी ती पुढे ढकलल्याचे जाहीर केले.

Balli Panchayat
Goa Tiger Reserve Controversy: केंद्रीय सक्षम समितीचा 'तो' अहवाल दबाव तंत्राखालीच! व्याघ्र क्षेत्राविषयी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांचा दावा

जोपर्यंत कायमस्वरूपी सचिवांची नियुक्ती होत नाही व गत अनेक ग्रामसभांचे इतिवृत्तांत सादर होत नाहीत, तोपर्यंत ग्रामसभा होऊ देणार नाही, असे स्थानिकांनी यावेळी जाहीर केले.

भिकू वेळीप म्हणाले की, पंचायतीत काहीच कामे होत नाहीत, गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com