Baina Beach: वॉटर स्पोर्ट्स उपकरणांची नासधूस, बायणा किनाऱ्यावरील घटना; सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

Baina beach water sports damage: बायणा किनाऱ्यावर ठेवण्यात आलेल्या ‘बनाना बंपर’ व ‘जेट स्की’ या वॉटर स्पोर्ट्स उपकरणांची अज्ञात व्यक्तींनी नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Baina beach water sports damage
Baina beach water sports damageDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: बायणा किनाऱ्यावर ठेवण्यात आलेल्या ‘बनाना बंपर’ व ‘जेट स्की’ या वॉटर स्पोर्ट्स उपकरणांची अज्ञात व्यक्तींनी नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संबंधित व्यावसायिकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. किनाऱ्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याचा गैरफायदा घेत हा प्रकार घडल्याचे व्यावसायिक कालिदास फडते यांनी सांगितले. पर्यटन खात्याने येथे तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी त्यांनी व इतर व्यावसायिकांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत जेट स्कीच्या इंजिनमध्ये साखर टाकून ते निकामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच ‘बनाना बंपर’ हे उपकरण धारदार वस्तूने कापण्यात आले. फडते यांनी वेळेत तपासणी केल्याने जेट स्कीचे मोठे नुकसान टळले, अन्यथा सुमारे २५ लाखांचा फटका बसला असता. मात्र, आता दुरुस्तीसाठी त्यांना मोठा खर्च करावा लागणार आहे.

बायणा किनाऱ्यावर २०१७ पासून वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात आले असून, हळूहळू हा व्यवसाय वाढत आहे. खाणबंदीमुळे मुरगाव बंदरातील लाँच मालकांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सुमारे २७ लाँच मालकांनी एकत्र येत ‘बायणा बीच वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन’ स्थापन केली. त्यानंतर स्कुबा डायव्हिंग व विविध वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात आले, ज्यामुळे पर्यटकांची संख्या वाढू लागली.

Baina beach water sports damage
Goa Theft: चाकूचा धाक दाखवून बाणावलीत डॉक्टरला  लुटले, दीड लाखांचा ऐवज पळविला

तथापि, अलीकडे काही बोटी निरलाहून पर्यटकांना घेऊन येतात आणि त्यांच्यासाठी बोटीवरच जेवणाची व्यवस्था करतात. यामुळे किनाऱ्यावरील शॅक व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली आहे. तसेच, अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसताना पर्यटकांना जेवण पुरवले जात असल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Baina beach water sports damage
Goa Accident Death: 98 दिवसांत 66 जणांचे बळी, दर तिसऱ्या दिवशी एक मृत्यू; 80 टक्के अपघातांत दुचाकी

आम्ही प्रत्येक मोसमात सुमारे अडीच लाख रुपये कर भरतो. मात्र, बाहेरून येणाऱ्या बोटी पर्यटकांना किनाऱ्यावर न आणता बोटीवरच जेवण देतात. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे, बायणा किनाऱ्यावर घडलेल्या या घटनेमुळ व्यावसायिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. सरकारने या प्रकरणी लक्ष देण्याची गरज आहे.

- कालिदास फडते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com