Goa Rape Case: मुलीवर बलात्कार; पित्याला जामीन नामंजूर

Goa Rape Case: बलात्काराचा आरोप असलेल्या पित्याने जामिनासाठी केलेल्या अर्जाला पीडित मुलीने ना हरकत दिली तरी सत्र न्यायालयाने त्याला जामीन फेटाळला.
Court
Court Dainik Gomantak

Goa Rape Case: बलात्काराचा आरोप असलेल्या पित्याने जामिनासाठी केलेल्या अर्जाला पीडित मुलीने ना हरकत दिली तरी सत्र न्यायालयाने त्याला जामीन फेटाळला. त्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्याला जामीन दिल्यास तो पीडित मुलीला धमकावण्याचा तसेच पुराव्यात हेराफेरी करण्याची शक्यता आहे.

Court
Goa Government Job: वय ओलांडले, तरी ‘भिवपाची गरज ना!’

अजूनही मुख्य साक्षीदारांच्या साक्ष तपासणे बाकी आहे, असे निरीक्षण न्यायालयाने जामीन फेटाळताना आदेशात म्हटले आहे. उत्तर गोव्यात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी पत्नीने पतीविरुद्धच पोलिसात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी तक्रारदारच्या पतीला १८ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याच्याविरुद्ध विनयभंग, बलात्कार व पोक्सो कायद्याखाली गुन्हे दाखल करून अटक केली होती. पोलिसांनी संशयिताविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. सुनावणीवळी पीडित मुलीची व तिच्या आईची तसेच दोन पंच साक्षीदारांची जबानी न्यायालयात नोंद झाली आहे.

Court
Goa Tourism: किनारी पर्यटनाची वेगळ्या अर्थाने ओळख करून देणार पर्यटन मंत्री रोहन खंवटे

मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयात साक्ष देताना त्याला दुजोरा दिला नाही. तिच्या बहिणीच्या दबावाखाली ही तक्रार दाखल केल्याचे सांगितले होते. मुलीनेही न्यायालयात जबानी फिरवली आहे. त्यामुळे संशयिताविरुद्ध दाखल केलेली तक्रार खोटी आहे. गेल्या अडीच वर्षापासून तो कोठडीत आहे. न्यायालयाने जामीन देताना घातलेल्या अटींचे पालन केले जाईल, असा युक्तिवाद संशयिताच्या वकिलांनी केला होता.

...तर संशयित धमकावू शकतो !

संशयिताने केलेला गुन्हा गंभीर आहे. त्याने केलेल्या गुन्ह्यासंदर्भातचे मोबाईलमध्ये अश्‍लिल व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत. त्याने पीडित मुलीला या गुन्ह्याची माहिती तिच्या आईकडे उघड न करण्यासाठी चाकूचा धाकही दाखवला होता. त्याला जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो.तो साक्षीदारांना धमकावू शकतो. 29 पैकी फक्त 4 साक्षीदारांची साक्ष नोंद झाली आहे. त्यामुळे त्याला जामीन देणे योग्य नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com