Badminton: बॅडमिंटन खेळाडूंसाठी वय सुधार योजना

भारतीय संघटनेचा निर्णय: उपाययोजनेस गोवा बॅडमिंटन संघटनेचा पाठिंबा
Badminton
Badminton Dainik Gomantak
Published on
Updated on

किशोर पेटकर

Badminton खेळाडूंच्या वयाबाबत होणारी फसवणूक रोखण्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बॅडमिंटनपटूंसाठी माफी योजनेअंतर्गत ऐच्छिक वय सुधार योजना राबविण्यात येईल. ज्यांचे वय चुकले आहे, त्या खेळाडूंना अधिकृत जन्मतारखेची वीस दिवसांच्या कालावधीत फेरनोंदणी करता येईल.

भारतीय बॅडमिंटन संघटनेची आमसभा गुवाहाटी येथे झाली, त्यावेळी यासंदर्भात निर्णय झाला. योजना आणि संबंधित परिपत्रक भारतीय संघटनेने सोमवारी जारी केले. या निर्णयामुळे बॅडमिंटन खेळामधील वयाच्या फसवणुकीच्या गंभीर समस्येचे निराकरण करणे शक्य होईल, असे राष्ट्रीय संघटनेला वाटते.

Badminton
Morpirla Quepem: शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांचा मोरपिर्ला प्राथमिक शाळेवर बहिष्कार

यासंदर्भात माहिती गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी दिली. राज्य संघटना या योजनेस अनुकूल आहे. हेबळे भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या वय फसवणूक समितीचे सदस्यही आहेत. त्यांनी याबाबतच्या महत्त्वपूर्ण उपाययोजनेस पाठिंबा व्यक्त केला.

दोषी आढळल्यास कडक कारवाई

वय नोंदणीत माफी योजनेनुसार बदल केला नाही आणि खेळाडूने वय फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यास भारतीय बॅडमिंटन संघटनेने संबंधित खेळाडूवर कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच केले आहे.

त्यानुसार संबंधित खेळाडूच्या स्पर्धा सहभागावर दोन वर्षांची बंदी लादण्यात येईल, फौजदारी खटला दाखल केला जाईल, तसेच कायदेशीर कारवाईही करण्यात येईल.

केवळ दोषी खेळाडूंनाच नव्हे, तर त्यांचे पालक आणि प्रशिक्षक यांना कारवाईअंतर्गत समाविष्ट करण्यासाठी दंडात्मक उपायांची व्याप्ती वाढविण्याचा विचार आहे, यामुळे सामुहिक कर्तव्य आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेला वाटत असल्याचे हेबळे यांनी सांगितले.

Badminton
Ponda Water Scarcity: जलसाठे, धरणे कोरडी; शहरात पाण्याचे भीषण संकट

गतमोसमात वयाबाबत तक्रारींची नोंद

खेळाडूंच्या वयाबाबत संशय आल्याने गतमोसमातील अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धांच्या वेळेस तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. वयाबाबतच्या विसंगतींमुळे पालकांच्या गटाने चिंता व्यक्त केली होती, अशी माहिती संदीप हेबळे यांनी दिली. या चिंतेचे स्वरुप गंभीर आहे.

ज्युनियर गटातील दोन हजाराहून अधिक खेळाडूंनी त्यांच्या मूळ जन्मदाखल्याऐवजी अस्पष्ट ‘वैद्यकीय प्रमाणपत्रे’ सादर केली आहेत. भारतीय बॅडमिंटन संघटनेने त्वरित कारवाई करून वय नियमाचे उल्लंघन केलेल्या आठ ते दहा खेळाडूंना निलंबित केले होते, असे हेबळे यांनी नमूद केले.

धक्कादायक बाब म्हणजे, राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक विजेते खेळाडू, भारताचे वयोगट पातळीवर केलेले खेळाडूंही दोन जन्मदाखले बाळगत असल्याचे निदर्शनास आले, यावरून वय फसवणूक समस्येचे गांभीर्य जाणवत असल्याचे हेबळे म्हणाले.

Badminton
उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा किलबिलाट सुरु

सर्वसमावेशक मानक कार्यपद्धती

भारतीय बॅडमिंटन संघटनेद्वारे वय सुधारणा योजना आणि सर्वसमावेशक मानक कार्यपद्धती (एसओपी) सादर करून प्रामाणिकपणा, सचोटी आणि पारदर्शकता वाढविण्याच्या दिशेने एक प्रोत्साहनदायक आणि स्तुत्य पाऊल टाकले आहे, असे हेबळे यांनी नमूद केले.

वय फसवणुकीविरोधात ठोस कारवाई करून देशभरातील युवा बॅडमिंटनपटूंच्या उत्तुंग प्रतिभेचे पालनपोषण करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्याचे राष्ट्रीय संघटनेचे उद्दिष्ट असल्याचे हेबळे यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com