केपे : केपे मतदारसंघात यावेळी बाबू कवळेकर व एल्टन डिकॉस्ता यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीपूर्वीच विजयोत्सव साजरा केला. निवडणूक निकालापूर्वीच या दोन्ही उमेदवारांच्या गटांनी जल्लोष साजरा केल्यामुळे मतदार मात्र संभ्रमात पडले आहेत. (Goa Election 2022 News Updates)
यावेळी केपे मतदारसंघात काँग्रेस व भाजप (BJP) यांच्यामध्ये जबरदस्त लढत होणार असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. बाबू कवळेकर हे केपेतून चारवेळा निवडून आले असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्यासुद्धा मोठी आहे. त्यांनी पुन्हा आपणच निवडून येणार असल्याचे सांगितले आहे. एल्टन डिकॉस्ता यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केपेत लोकांना बदल हवा होता आणि तो होणार असल्याचे सांगितले.
केपे पालिका तसेच अवेडे पंचायत क्षेत्रात काँग्रेसला (Congress) अनुकूल असे मतदान झाल्याचे काहीजणांचे मत असून मोरपिर्ला, बार्से, बाळ्ळी, फातर्पा, खोला, शिरवई, सोमेश्वर, कट्टा, आमोणा या भागात कवळेकर यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे लोक सांगत आहेत. मतमोजणी 10 मार्चला होणार असून सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत सीलबंद झाले आहे. त्यामुळे 2022 मधील केपेचा (Quepem) आमदार कोण? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बाबूविरोधकांचा डिकॉस्तांना पाठिंबा
केपे मतदारसंघात बाबू कवळेकर यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी डिकॉस्ता यांना छुपा पाठिंबा दिला असून त्यांच्याच बळावर ते जिंकून येणार असल्याची चर्चा सध्या केपेत रंगली आहे. बाबू कवळेकर यांचेसुद्धा बरेच कट्टर समर्थक असल्याने त्यांनीसुद्धा यावेळी फक्त आणि फक्त कवळेकरच विजयी होणार असल्याचे नगरसेवक दयेश नाईक यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.