गोव्यात पुन्हा भाजप सरकारच; अमित शहांना विश्वास

भाजपने गोव्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी आतापासून सुरुवात केली आहे.
Amit Shah
Amit ShahDainik Gomantak
Published on
Updated on

आगामी पाच राज्यातील निवडणूकीच्या पाश्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोवा दौऱ्यावर आले आहेत. भाजपने गोव्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी आतापासून सुरुवात केली आहे.

शहा म्हणाले, आजच्या दिवशी गोव्यामध्ये नॅशनल कम्पसचे उद्घाटन करण्यात आले आहे. मी याआगोदर गोव्यात जास्त वेळा आलेलो नाही. मात्र गोव्याच्या संघर्षाच्या कथा मी वाचल्या आहेत. स्वातंत्र्यकाळामध्ये गोव्यातील ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना मी प्रथम नमन करतो म्हणत केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातद केली.

Amit Shah
'काँगेस' हाच खरा आमचा विरोधक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दरम्यान, गोव्याचे सुपुत्र मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. पर्रीकरांच्या पावलांवर पाऊल टाकत डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली आहे. मोदींच्या निर्देशांवर पर्रीकरांनी आपल्या जवान बांधवांना 'वन रॅन्क वन पेन्शन' मिळवून दिली आहे. आपल्या जवांनाच्या बलिदानाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदींच्या काळातच पर्रीकरांनी अनेक मोठे निर्णय घेतले. यातीलच एक म्हणजे काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी आणि आपल्या सीमांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केली, असल्याचा उल्लेखही यावेळी शहांनी बोलताना केला.

तसेच, नॅशनल फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून गोव्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स लॅबची स्थापना करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांनी केला. फॉरेन्सिक सायन्सचा विकास देशामध्ये झाला परंतु मानव संसाधनाचा अभाव असल्याने हे क्षेत्र मागे पडले होते. मात्र आता मानव संसाधनावर भर देत फॉरेन्सिक सायन्सचा खऱ्या अर्थाने विकास करण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या काळामध्ये सुरु आहे.

Amit Shah
भाजपचे चाणक्य गोव्यात

शिवाय, फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यास करण्यासाठी गोव्यातील मुलांना सरकारने प्रोत्साहित करावे. मला माहीत आहे की, गोवा देशातील छोटे राज्य आहे, मात्र देशाच्या योगदानामध्ये त्याचा वाटा महत्त्वाचा आहे. गोव्यात जगभरातून पर्यटक येतात त्यामुळे पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे शहांनी सांगितले. कोरोना काळात 100 लसीकरण करत गोव्याला देशात अग्रेसर बनविण्यात आले आहे. त्याचबरोबर पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी मोदी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. भारत सरकारच्या अनेक योजनांचा फायदा गोव्यातील नागरिक घेत असून या योजनांची अमंलबजावणी करण्यासाठी प्रमोद सावंत सरकारने पूर्ण योगदान दिले आहे. तसेच राज्यात 200 मोबाईल टॉवर उभारणे, राज्यातील स्टार्टप्स क्षेत्रातील विकासासाठी महत्त्वाचे योगदान देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटीबध्द आहे. 10 वर्षांच्या काळात राज्य सरकारने खऱ्या अर्थाने गोव्याचा विकास केला आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत गोव्यात भाजपचेच सरकार पूर्ण बहुमाताने येणार असल्याचा विश्सास देखील शहा यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com