Ponda: बाबासाहेबांच्या संविधानामुळे समाजाला बळकटी! रवी नाईकांचे गौरवोद्गार, 'दलित सखा’ पुरस्कार जाहीर

Ravi Naik: संविधानामुळे बळकटी मिळाली म्हणून आज सर्व समाजाला मानाने जगता येते, असे उद्‍गार फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी काढले.
Ravi Naik
Ravi Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: विखुरलेल्या समाजाला एकत्रित करण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांची त्यांना जाणीव करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे बळकटी मिळाली म्हणून आज सर्व समाजाला मानाने जगता येते, असे उद्‍गार फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी काढले.

फोंड्यातील जीव्हीएम सभागृहात आज रविवारी फोंडा एससी असोसिएशनतर्फे कला आणि संस्कृती खात्याच्या सहकार्याने आयोजित सृजनोत्सव या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फोंडा पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर तसेच फोंडा एससी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष सातार्डेकर व ज्ञानेश्‍वर कवळेकर तसेच प्रेमानंद कुडाळकर हे समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

रवी नाईक म्हणाले की, समाज संघटित झाला तर कुटुंब संघटित होते आणि कुटुंब संघटित झाले, तर राज्य आणि देश संघटित होण्यास वेळ लागत नाही, म्हणून आधी प्रत्येकाने संघटित व्हायला हवे. अनुसूचित जाती वर्गातील लोकांनी संघटितपणा दाखवला आहे, म्हणून आज महिला मुले यांना विविध स्पर्धा उपक्रमांतून प्रोत्साहन मिळत आहे. ही संघटित वृत्ती कायम ठेवा असे सांगताना देशाच्या उत्कर्षासाठी सर्वांनी वावरूया, असे आवाहन रवी नाईक यांनी केले.

पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बौद्धिकतेच्या बळावर केवळ देशातच नव्हे, तर जगभरात नाव कमावले. वाट चुकलेल्यांना योग्य दिशा दाखवताना त्यांनी देशाचे संविधान लिहिले. त्यामुळे देशातील प्रत्येक समाजातील घटकाला मानाने जगता आले.

स्वागत व प्रास्ताविक संतोष सातार्डेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन गोकुळदास कुडाळकर यांनी केले. भामईकर कन्यांनी सुरेख स्वागत नृत्य सादर केले. त्यानंतर विविध स्पर्धात्मक उपक्रम झाले.

Ravi Naik
Ravi Naik on Ghat Road: गोवा-बेळगाव महामार्गावरील घाट रस्त्यांचे काम एप्रिल २०२५ पर्यंत होणार पूर्ण

रवी नाईक यांना दलित सखा’ पुरस्कार!

फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांना फोंडा एससी असोसिएशनतर्फे दलित सखा पुरस्कार जाहीर झाला. सर्व समाजातील लोकांना संघटित करण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी रवी नाईक यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज समाजातील लोकांचा उत्कर्ष होत आहे, त्यामुळेच हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे आयोजकांनी जाहीर केले. पुढील कार्यक्रमात हा पुरस्कार रवी नाईक यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Ravi Naik
Ponda: फोंड्यात राजकीय वर्चस्वाची लढाई, ‘रुद्रेश्वर’मुळे रवी ‘फॉर्मात, ‘महाकुंभ’मुळे भाटीकरांना ‘ऊर्जा’; काँग्रेसमध्ये शुकशुकाट

स्पर्धा उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

फोंड्यात आयोजित करण्यात आलेल्या एससी असोसिएशनच्या विविध स्पर्धा आणि उपक्रमांना उपस्थित महिला, पुरुष आणि युवा तसेच बाल कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकनृत्य, लोककला तसेच इतर प्रकार यावेळी घेण्यात आले. दिवसभर चाललेल्या या स्पर्धा कार्यक्रमानंतर संध्याकाळी बक्षीस वितरण करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com