Azad jama mosque bicholim
Azad jama mosque bicholimDainik Gomantak

Jama Masjid Bicholim: आझाद जामा मशिदीच्या निधीत गैरव्यवहार! अध्यक्षांसह गावकऱ्यांचा आरोप; डिचोली पोलिसांकडे तक्रार

Azad Jama Masjid Bicholim: नझीर बेग यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी (गुरुवारी) तक्रार डिचोली पोलिसांत केली. या निवेदनावर ७० हून अधिक मुस्लिम गावकरी बांधवांनी सही केली आहे.
Published on

डिचोली: येथील आझाद जामा मशिदीचा कारभार बेकायदेशीरपणे चालला असून, मशिदीच्या निधीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून, या घोटाळ्यामागे सचिव आणि खजिनदारांचा हात आहे, असा आरोप मशीद समितीचे अध्यक्ष नझीर बेग, युसूफ शेख, फिरोज बेग आणि इतर मुस्लिम बांधवांनी केला आहे.

नझीर बेग यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी (गुरुवारी) तक्रार डिचोली पोलिसांत केली. या निवेदनावर ७० हून अधिक मुस्लिम गावकरी बांधवांनी सही केली आहे. दरम्यान,सहकार निबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार मशिदीची निवडणूक घ्यावी.

Azad jama mosque bicholim
Jama Masjid: भिंत जबरदस्ती मोडली! जामा मशिदीच्या कुंपणावरून वाद; समितीने केली तक्रार

निवडणूक घेण्यास टाळाटाळ केल्यास न्यायालयात धाव घेऊ, असे फिरोज बेग आणि इतरांनी स्पष्ट केले. प्रशासनाने सांगूनही जामा मशिदीची २०१९ नंतर निवडणूक झालेली नाही.

Azad jama mosque bicholim
Margao Jama Masjid: जामा मशिदीमध्ये आपलीच समिती अधिकृत; उर्फान मुल्ला यांचा दावा

गेल्या साडेसहा वर्षांत सचिव व खजिनदाराने मशिदीच्या निधीत गैरव्यवहार केला असून, मी अध्यक्ष असूनही मला अंधारात ठेवले, असा आरोप नझीर बेग यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com