Jama Masjid: भिंत जबरदस्ती मोडली! जामा मशिदीच्या कुंपणावरून वाद; समितीने केली तक्रार

Bicholim jama masjid: आझाद जामा मशिदीच्या कुंपणावरुन वाद निर्माण झाला आहे. रस्ता रुंदीकरण कामांतर्गत रस्त्याच्या बाजूने असलेली मशिदीच्या कुंपणाची पूर्वीची भिंत सोडून नवीन भिंत बांधली आहे.
Bicholim jama masjid
Bicholim jama masjid| Goa News In Marathi | Dainik Gomantak Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: मुस्लिमवाडा-डिचोली येथील आझाद जामा मशिदीच्या कुंपणावरुन वाद निर्माण झाला आहे. रस्ता रुंदीकरण कामांतर्गत रस्त्याच्या बाजूने असलेली मशिदीच्या कुंपणाची पूर्वीची भिंत सोडून नवीन भिंत बांधली आहे.

मात्र आता मुस्लिम बांधवांच्या एका गटाने भिंतीला आणखी एक गेट हवी, अशी मागणी करुन जबरदस्तीने या भिंतीचा काही भाग मोडला आहे, अशी तक्रार मशीद समितीने (सोमवारी) पत्रकार परिषदेत केली.

मोडलेली भिंत परत बांधून द्यावी. तसेच पोलिस आणि डिचोली पालिकेने भिंत मोडणाऱ्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणीही मशीद समितीने केली आहे.

भिंत मोडणाऱ्या मुस्लिम बांधवांविरोधात कारवाई करुन हा वाद मिटवला नाही, तर भविष्यात या मुद्यावरुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीतीही मशीद समितीचे सचिव बाला खान गोरी आणि इतरांनी व्यक्त केली आहे.

गेल्या मंगळवारी (ता. २३ ऑगस्ट) ही भिंत मोडली असून, तत्पूर्वी मशीद समितीतर्फे आदल्या दिवशी पोलिस तसेच पालिकेत तक्रार देण्यात आली होती, अशी माहिती बाला खान गोरी यांनी दिली.

Bicholim jama masjid
Jama Masjid: जामा मशिदीचा 'महिलाविरोधी' फर्मान, महिलांच्या प्रवेशावर बंदी

एकंदरीत या वादाला मशीद समितीचे अध्यक्ष मुख्य कारणीभूत आहेत. असा दावाही पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. सोमवारी डिचोलीत घेतलेल्या या पत्रकार परिषदेला संयुक्त सचिव आसिफ बेग, खालिद बेग, फैय्याज मामलेकर, मोहसीन शेख, मुस्ताफा बेग आणि अन्य उपस्थित होते. डिचोली बसस्थानक ते मुस्लिमवाडा हा रस्ता रुंद करुन त्याचे सौंदर्यीकरण करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.

Bicholim jama masjid
Bicholim: दगड घालून खड्डे बुजवले, पावसाने होत्याचे न्हवते केले; डिचोलीतील अंतर्गत रस्त्यांची लागली ‘वाट’

या कामांतर्गत रस्त्याच्या बाजूने असलेली आणि रुंदीकरणाला अडथळा ठरणारी बांधकामे सामंजस्यपणे मोडण्यात आली आहेत. आझाद जामा मशिदीच्या समोर असलेले समोर असलेल्या कुंपणाची भिंत मोडण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com