Vasco: कांतारा फेम नृत्य, मिरवणूक काढून वास्को अय्यप्पा मंदिर महोत्सवाची सांगता

श्री अय्यप्पा मंदिर मांगोर हिल वास्कोच्या वार्षिक महोत्सवाची सांगता उत्साहवर्धक वातावरणात झाली.
Vasco
VascoDainik Gomantak
Published on
Updated on

श्री अय्यप्पा मंदिर मांगोर हिल वास्कोच्या वार्षिक महोत्सवाची सांगता उत्साहवर्धक वातावरणात झाली. 12 जानेवारी रोजी कोडियेट्टमने या महोत्सवाची सुरुवात झाली. देवतांच्या प्रतिष्ठादिनाच्या शुभदिनी दैनंदिन विशेष पूजा थंथ्री मंदिरातील या समारंभाला रेव्ह. डॉ. इल्लथ श्रीकांत नारायणन नंबूथिरी, मंदिराचे पुजारी सी. प्रवीण आणि नारायण प्रसाद उपस्थित होते.

Vasco
Venus-Saturn closing: अवकाशात आज शुक्र-शनिचा अनोखा संयोग; गोव्यातही मोफत पाहता येणार, वाचा सविस्तर
Vasco
VascoDainik Gomantak

महोत्सवात दररोज तीन वेळा महाप्रसादाची सोय करण्यात आली. तसेच, सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. बायणा बीच येथे भगवान अय्यप्पांच्या मूर्ती आरती झाल्यानंतर महोत्सवाच्या सांगता सोहळ्याला सुरुवात झाली. सांगता सोहळ्याच्या शोभायात्रेला हनुमान मंदिर बायणा येथून सायंकाळी पाच वाजता सुरूवात झाली.

Vasco
Margao: धक्कादायक! PWD इंजिनिअरच्या पायावरून चालवला रोड रोलर
Vasco
VascoDainik Gomantak

सजावट केलेल्या मंदिरात भगवान अय्यप्पाच्या मूर्ती ठेवल्या होत्या. सांगत सोहळ्याच्या मिरवणुकीत थालपोलीसह शेकडो महिला व मुली, गोवन दिंडी नृत्य, कांतारा फेम नृत्य याचा समावेश होता.

मिरवणूक बायणा येथून वास्को सिटी, मांगोर हिल, वरुणापुरी अय्यप्पा सर्कल मार्गे भगवान अय्यप्पाच्या मंदिरात पोहोचली. पारायडलनंतर व कोडीयिरक्कम नंतर महोत्सवाची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com