Cooperative Society : अस्नोडा पंचशील सहकार सोसायटीला पुरस्कार; श्‍‍याम हरमलकर उत्कृष्ट चेअरमन

Cooperative Society : यावेळी सहकार मंत्री आणि प्रा. डॉ. अमृत नाईक यांनी सहकार क्षेत्रातील भूमिका व अर्थव्यवस्था याबद्दल माहिती दिली.
Assonora  Panchsheel Cooperative Society Shyam Harmalkar Excellent Chairman
Assonora Panchsheel Cooperative Society Shyam Harmalkar Excellent ChairmanDainik Gomantak
Published on
Updated on

Cooperative Society : साळ, अस्नोडा येथील पंचशील सहकारी सोसायटीला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकत्याच ७०व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहांतर्गत उत्तर गोवा साहाय्यक निबंधकांनी आयोजित केलेल्या ‘सहकार क्षेत्रातील भूमिका आणि अर्थव्यवस्था’ या कार्यक्रमात अस्नोडा पंचशील सहकार सोसायटीला दोन पुरस्कार प्राप्त झाले.

चांगले काम करणारी संस्था आणि संस्थेचे चेअरमन श्‍‍याम हरमलकर यांना उत्कृष्ट चेअरमन पुरस्काराने सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला . हे दोन्ही पुरस्कार श्‍‍याम हरमलकर यांनी संस्थेच्या वतीने स्वीकारले.

यावेळी संस्थेचे इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम म्हापसा येथील तुळशीराम सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, म्हापसाचे आमदार जोशुवा डिसोझा,

म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यश्या प्रिया मिशाळ, सहकार निबंधक मनुएल बार्रेटो, डीएमसी महाविद्यालयाचे वाणिज्य शाखेचे सहाय्यक प्रा. डॉ. अमृत नाईक, उत्तर गोवा सहायक निबंधक हरीश नाईक उपस्थित होते.

या कार्यक्रमाला उत्तर गोव्यातील सहकार सोसायटीचे चेअरमन व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सहकार मंत्री आणि प्रा. डॉ. अमृत नाईक यांनी सहकार क्षेत्रातील भूमिका व अर्थव्यवस्था याबद्दल माहिती दिली.

Assonora  Panchsheel Cooperative Society Shyam Harmalkar Excellent Chairman
Goa Politics: भाजपच्या कारभारावर दोन राज्यपालांकडून बोट

संस्थेच्या सर्व घटकांचे सहकार्य लाभले

अस्नोडा येथील पंचशील सहकारच्या आतापर्यंत अस्नोडा येथील मुख्य कार्यालयाबरोबर इतर ठिकाणीही शाखा उपलब्ध असून. १९९९ साली संस्था सुरू झाल्यापासून आतापर्यंत संस्थेने ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला असून संस्था भरभराटीसाठी संस्थेचे संचालक, कर्मचारी वर्ग, भागधारक, सहकार संस्था त्यांचे अधिकारी आणि शुभचिंतक यांचे सहकार्य लाभल्याचे शाम हरमलकर यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com