भाऊसाहेब बांदोडकरांच्‍या कार्याला तोड नाही: अविनाश भोसले

बांदोडकर यांनी शिक्षण, वैद्यकीय सेवा, शेतकऱ्यांसाठी आणि प्रत्येक गोमंतकीयाला सुखाने स्वाभिमानाने जगता यावे यासाठी कार्य केले
स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर
स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकरDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पेडणे: गोवा मुक्तीनंतर भाऊसाहेब बांदोडकर यांनी शिक्षण, वैद्यकीय सेवा, शेतकऱ्यांसाठी व प्रत्येक गोमंतकीयाला सुखाने व स्वाभिमानाने जगता यावे यासाठी जे कार्य केले आहे, त्याला तोड नाही. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने गोव्याचे खरे भाग्यविधाते आहेत. भाऊसाहेब बांदोडकरांची तुलना कोणत्याही नेत्याशी होऊ शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस गोवाचे उपाध्यक्ष ॲड. अविनाश भोसले यांनी केले.

स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर
कुंकळ्‍ळी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

मालपे - पेडणे येथे शिवसेनेतर्फे येथील शिवसेना कार्यालयात भाऊसाहेब बांदोडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गोवा राज्य शिवसेना उपप्रमुख सुभाष केरकर उपस्थित होते. ॲड. भोसले पुढे म्हणाले, की भाऊसाहेबांचा जन्म गरीब कुटुंबात झाला, तरी स्वतःच्या हिमतीवर ते श्रीमंत झाले. गरिबीतील समस्या माहीत असल्याने त्यांनी गरीब सामान्यांना नेहमीच हात दिला. गरीब सामान्य शिकून मोठे व्हावेत म्हणून वाड्यावाड्यांवर शाळा सुरू केल्या. कुळ, मुंडकार कायदा, आरोग्यासाठी सरकारी दवाखाने, इस्पितळे सुरू केली. युवा पिढीने त्यांचा आदर्श ठेवावा.

स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची दुरावस्‍था

यावेळी सुभाष केरकर म्हणाले, की भाऊसाहेब बांदोडकरांमुळे सर्वसामान्याला माणूस म्हणून जगता आले व ताट मानेने जगता आले. भाऊसाहेब बांदोडकरांशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. मोपा विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे ही शिवसेनेची

मागणी असून ही मागणी शिवसेना लावून धरणार आहे. समित परवार यांनी स्वागत व प्रास्ताविक करून आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com