ऑस्ट्रेलियाचे फिलिप नॉयस सत्यजीत रे लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डचे मानकरी; IFFI 2024 मध्ये होणार सन्मान

Satyajeet Ray Lifetime Achievement Award: चित्रपट क्षेत्रामधील योगदानासाठी दिग्दर्शक फिलिप नॉयस यांना सत्यजीत रे लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड
Satyajeet Ray Lifetime Achievement Award: चित्रपट क्षेत्रामधील योगदानासाठी दिग्दर्शक फिलिप नॉयस यांना सत्यजीत रे लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड
IFFI 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Satyajeet Ray Lifetime Achievement Award at IFFI 2024

पणजी: दरवर्षी प्रमाणे यंदा पुन्हा चित्रपटांचा सोहळा आयोजित करण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी हा सोहळा जगभरातील चित्रपट प्रेमींसाठी एक पर्वणीच असते आणि दरवर्षी यात कोणते नवीन बदल होतील याकडे सर्वांचे लक्ष लागून असते. यंदा इफ्फीचा सोहळा आयोजित करण्यासाठी एकूण २८ कोटी रुपये खर्च करण्यात आलेत अशी बातमी समोर आली आहे.

यंदाच्या वर्षी इफ्फीच्या प्रीमियरची सुरुवात मायकेल ग्रेस फिल्म 'बेटर मॅन'ने होणार आहे. तसेच नवीन दिगदर्शकांना व्यासपीठ मिळावे किंवा त्यांना आंतराष्ट्रीय स्तरावर कला सादर करण्याची संधी मिळावी म्हणून नवख्या दिग्दर्शकांसाठी एक वेगळा विभाग सुरु केला जाणार आहे.

Satyajeet Ray Lifetime Achievement Award: चित्रपट क्षेत्रामधील योगदानासाठी दिग्दर्शक फिलिप नॉयस यांना सत्यजीत रे लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड
IFFI 2024: 'इफ्फी'त रॉकस्टार! राज कपूर यांच्या आठवणींना 'रणबीर' देणार उजाळा, तारीख आणि वेळ जाणून घ्या

एवढंच नाही तर यंदाच्या इफ्फीमध्ये इको कॉन्शस-मिशन लाइफवर आधारित महिला दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले एकूण ४७ चित्रपट दाखवले जाणार आहे आणि भारतीय पॅनोरमामध्ये तरुण चित्रपट निर्मात्यांचे ६६ चित्रपट, २५ फीचर चित्रपट आणि २० नॉन फीचर चित्रपट दाखवले जाणार आहेत.

फिलिप नॉयस यांना सत्यजीत रे लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार हा चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा सन्मान समजला जातो. यंदाच्या वर्षी इफ्फीच्या सोहळ्यात ऑस्ट्रेलियाचे चित्रपट दिग्दर्शक फिलिप नॉयस यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रामधील योगदानासाठी सत्यजीत रे लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com