Akshata Chhatre
2004 पासून गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच IFFI चा सोहळा होतो. IFFI म्हणजे जगभरातील चित्रपटप्रेमींसाठी हक्काचं ठिकाण.
वर्ष 2020 मध्ये गोवा सरकारने IFFI वर 12 कोटी रुपयांचा खर्च केला होता आणि आता तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल कारण यंदा सरकार IFFI वर एकूण 28 कोटी रुपये खर्च करत आहे.
एवढा खर्च होतोय म्हणजे यंदा IFFI मध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळेल ना? चला मग यंदा IFFI मध्ये काय नवीन आहे पाहूया.
यंदा IFFI ला एकूण 20 वर्ष पूर्ण होतील आणि म्हणूनच 15 नोव्हेंबर पर्यंत सगळी तयारी अगदी जय्यतपणे करावी असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
यंदा 22 नोव्हेंबरला पणजीत डीबी रोड ते कला अकादमीपर्यंत शिगमोत्सव आणि कार्निवलचा अनोखा संगम असलेला परेड पाहायला मिळेल.
चित्रपटांच्या स्क्रीनगच्या बाबतीत बोलायचं झालं तर केवळ ओपन ऑडिटोरियममध्ये नाही तर आग्वाद येथील हेलिपॅडवर चित्रपट दाखवले जातील.
याशिवाय योग सेतूच्या जवळ एक खास एकक्सिबिशन देखील भरणार आहे. काय मग? 20 ते 28 गोव्याला जाणार ना?