Manish Jadhav
गोव्याची मनमोहीत करणारी न्यारी दुनिया प्रत्येकाला खुणावते. पर्यटकांच्या दर्दीपणाला गोवा समृद्ध करतो.
गोव्याचं मोहीनी घालणारं निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या दिलाच्या तारा छेडून जातं. व्यस्त कामातून वेळ मिळाला की, गोव्याची वाट धरतात.
गोव्याची संस्कृती, फेस्टिव्हल आणि माहोल पर्यटकांच्या जोगीया मनाला भुरळ पाडतं. पर्यटकांच्या तरल मनाला गोवा साद घालतो.
गोव्याच्या प्लॅनमध्ये तुम्ही जलक्रीडांचा निखळ आनंद घेवू शकता. सुखावणारं गोव्याचं लालित्य मनाला भारावून टाकतं.
गोव्यात लवकरच पर्यटन हंगाम सुरु होणार आहे. गोवा हे फेस्टिव्हलची नांदी आहे. गोव्यातील फेस्टिव्हल पाहण्यासाठी पर्यटक मोठ्याप्रमाणात येतात. तुम्हीही गोव्याला नक्की भेट दिली पाहिजे.
गोव्यात आल्यानंतर तुम्ही गोवन फूडची नक्की चव चाखली पाहिजे. अस्सल गोवन मसाल्यांमध्ये तयार करण्यात आलेले फिश डीश तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे.
गोवा एक वेडिंग डेस्टिनेशन म्हणून उदयास आले आहे. बॉलिवूड सिनेताऱ्यांसह लोक गोव्यात लग्नगाठ बांधण्यासाठी येतात.