Ghode Modni Dance
Ghode Modni Dance Dainik Gomantak

कोपार्डेत आकर्षक घोडेमोडणी

शिमगोत्सव जल्लोष: करवल्या फिरल्या घरोघरी
Published on

वाळपई: कोपार्डे सत्तरी येथे काल शिमगोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी रात्री मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांच्या साक्षीने घोडे मोडणी अभुतपूर्व जल्लोषात संपन्न झाली. आज रविवारी करवल्या उत्सवाला सुरुवात झाली. शिगमोत्सवानिमित्त सजलेल्या करवल्या घरोघरी फिरल्या. त्यावेळी प्रत्येक घरातील लोकांनी करवल्यांची पूजा केली. रविवारी दिवसभर करवल्या उत्सव करण्यात आला. करवल्या नंतर उद्या घरोघरी देव फिरणार आहेत. काल शनिवारी कोपार्डेत ब्राम्हणी महामाया देवस्थानच्या प्रांगणात घोडे मोडणी खेळण्यात आली.

 Ghode Modni Dance
मनसा क्रिएशन्सतर्फे पणजीत आज आंतरराष्ट्रीय कविता दिवस

घोडेमोडणीत रिंगणाच्या माध्यमातून केला जाणारा खेळ अगदी जोशपूर्ण दिसून आला. युवा वर्गांनी यात विशेष करुन सहभाग दर्शवून घोडे मोडणीत रंगत आणली होती. गेल्या शेकडो वर्षापासून घोडेमोडणी केली जाते आहे.

उद्या न्हावणाने होणार उत्सवाची सांगता

मंगळवारी न्हावण होऊन शिमगोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे. कोपार्डेचे न्हावण प्रसिध्द आहे. यावेळी भार संचार होऊन उत्सव केला जातो. व शेवटी लोकांना न्हावण दिले जाते. काल शनिवारी ढोल ताशांच्या गजरात घोडे मोडणीवेळी रिंगण करण्यात आले होते. अगदी उत्साहाच्या वातावरणात सर्वजण रममाण होऊन गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com