Cape News : महिलांनी छेडले आंदोलन; कुपवाडा, केपे पाणी समस्येकडे वेधले लक्ष

Cape News : याबाबत महिलांनी सांगितले की, कुपवाडा परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यामार्फत प्रयत्न करून पाणी पुरवठा सुरळीत करून घेतला.
cape
capeDainik Gomantak
Published on
Updated on

Cape News :

केपे, पाणी टंचाईमुळे हैराण कुपवाडा, केपे येथील महिलांनी तेथील जलवाहिनीच्या व्हॉल्वजवळ एकत्र येत धरणे आंदोलन केले. येथील पाणी दुसरीकडे वळविण्यात येत असल्याबद्दल या महिलांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.

याबाबत महिलांनी सांगितले की, कुपवाडा परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यामार्फत प्रयत्न करून पाणी पुरवठा सुरळीत करून घेतला. परंतु आता हे पाणी अडणे येथील धावतेवाडा व कावरे येथे वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

cape
Goa Murder Case: वास्कोत घरगुती वादातून पत्नीचा खून, पती पोलिस स्थानकात हजर

त्यामुळे येथील पाणी टंचाई आणखी वाढणार आहे. याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंते प्रशांत कामत व कनिष्ठ अभियंते सिध्देश पावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाडा येथून पूर्वीपासूनच कावरे येथे पाणी पुरवठा सुरू आहे. कावरे गाव उंचावर आहे, त्यामुळे कुपवाड्यावर पाणी कमी पडणार नाही. धावतेवाडा येथेही हे पाणी पुरवावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com