Goa liquor Seized in Karanataka: गोव्यातून कर्नाटकात मद्य तस्करी करण्याचा प्रयत्नात असलेल्या एका ट्रक चालकाला बुधवारी रात्री अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
अनमोड तपासणी नाका येथे ही कारवाई करण्यात आली.
आयशर कंपनीच्या NL 01 AD 7170 या वाहनातून ही बेकायदेशीर वाहतूक केली जात होती. पोलिसांनी 43.280 लिटर गोवा बनावटीचे मद्य जप्त केले आहे. तसेच ट्रकचा चालक मनोज कुमार याला अटक करण्यात आली आहे.
मनोजकुमार हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही दारू कर्नाटकात वितरीत करण्यात येणार होती, असे समजते.
गोव्याच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल असणार आहे. निवडणुकीवेळी प्रचारात आणि मतदारांना लुभावण्यासाठी दारूच्या बाटल्यांचे वाटप केले जात असते. त्यासाठी शेजारील गोव्यातून मद्यतस्करीचे प्रयत्न होत असल्याचे समोर येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.