Bull Fight in Goa
Bull Fight in Goa Google Image

Bull Fight in Goa: तळावलीत पोलिसांना न जुमानता धिरयो; बैल मालकांवर गुन्हा दाखल

गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहेत धिरयो
Published on

Bull Fight in Goa: गोव्यातील अनेक ठिकाणी बैलांच्या बेकायदा झुंजी लावल्या जातात. या पारंपरिक प्रकाराला येथे धिरयो या नाावाने ओळखले जाते. तथापि, विविध निर्बंधांमुळे आणि पोलिस कारवाईच्या भीतीने सहसा धिरयो आयोजित केले जात नाहीत. पण काही ठिकाणी छुप्या पद्धतीने धिरयोचे आयोजन केले जाते. नावेली-तळावली भागात गेल्या तीन दिवसांपासून धिरयोचे आयोजन केले जात आहे.

Bull Fight in Goa
CM Pramod Sawant: किनाऱ्यांची सुरक्षा होणार सक्षम; 15 मीटर इंटरसेप्टर बोट गोवा पोलिसांच्या ताफ्यात दाखल

पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून, धिरयोचे आयोजन येथे केले गेले. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर गुरूवारी पोलिसांनी बैल मालक युसूफ सय्यद आणि नहीद मोहम्मद यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

बुधवारी कोलवा चर्चमागील शेतात भरदुपारी धिरयोचे आयोजन केले गेले होते. सुमारे पाचशे लोकांचा जमावही या ठिकाणी उपस्थित होता. सुमारे अर्धा तास हा थरार सुरू होता. यावर अनेक धिरयोप्रेमींनी लाखोंचा सट्टाही लावला होता. विशेष म्हणजे, येथून पोलिस स्थानक हाकेच्या अंतरावर आहे, तरीदेखील पोलिसांना याची माहिती नव्हती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com