MPT : मुरगाव बंदरातून दोनशे कोळसावाहू ट्रक 6 दिवसांनंतर मार्गस्‍थ

वाहतुकीसाठी गेट क्र. 1 चा वापर; ग्रामस्‍थांची मागणी सशर्त मान्‍य
MPT
MPTDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या पुढाकारातून झालेल्‍या खास बैठकीनंतर मंगळवारी रात्री उशिरा मुरगाव पोर्ट ट्रस्‍ट भागात मागील सहा दिवसांपासून अडवून ठेवण्‍यात आलेले 200 हून अधिक कोळसा व बॉक्साईटवाहक ट्रक सोडण्‍यात आले. वास्‍को शहरातून सदर ट्रकांची ये-जा होऊ नये, अशी स्‍थानिकांची भूमिका होती. त्‍यानुसार आता गेट क्रमांक 9 ऐवजी 1 वरून अवजड ट्रक मार्गस्‍थ होतील.

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी दुपारी मुरगाव बंदरातील 9 नंबर गेटसमोर आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. पण, प्रशासनाने लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय माघार घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. अखेर मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍या उपस्‍थितीत जिल्‍हाधिकारी, ‘एमपीटी’चे पदाधिकारी, स्‍थानिकांचे प्रतिनिधी व आमदार यांची महत्त्‍वाची बैठक झाली. यावेळी विविध मुद्यांवर विस्‍ताराने चर्चा झाली.

MPT
Curchorem : लग्नघरात साधला चोरट्याने डाव; 70 लाखाचा ऐवज लांबवला

वेगावर असेल मर्यादा

1 पुढील दिवसांत गेट क्रमांक 9 ऐवजी 1 वरूनच बॉक्‍साईट, कोळसावाहू ट्रक मार्गस्‍थ होतील.स्‍थानिकांची ही मागणी मान्‍य करताना एक अटही ठेवण्‍यात आली आहे.

2 मुरगाव क्रूझ टर्मिनलवर पर्यटक जहाजे येतात. त्‍यातील परदेशी पर्यटक गेट क्रमांक १वरून अन्‍यत्र जातात. परदेशी जहाजे जेव्‍हा टर्मिनलवर येतील, तेव्‍हा ट्रक हे गेट क्रमांक 9 वरूनच ये-जा करतील, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

3 त्‍यावर स्‍थानिकांनी ही अट मान्‍य केली. दरम्यान ट्रकांच्या वेगावर मात्र मर्यादा असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com