Curchorem : लग्नघरात साधला चोरट्याने डाव; 70 लाखाचा ऐवज लांबवला

मागच्या दरवाजाने प्रवेश करत चोरट्याने साधला डाव
चोरी
चोरीDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: राज्यात चोऱ्यांच्या घटनांमध्ये रोज वाढ होत चालली असून पंटेमळ, कुडचडे येथे सोमवारी ( दिनांक 19 डिसेंबर ) रोजी रात्री चोरट्यांनी लग्न घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे साठ ते सत्तर लाख रुपयांच्या ऐवज लंपास केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे कुडचडेत लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

(Jewellery worth Rs 70 lakh has been stolen from a house at Curchorem)

प्राप्त माहितीनुसार पंटेमळ ( कुडचडे ) येथील युसूफ शेख यांच्या मुलीचे लग्न होते व सोमवारी रात्री स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता व संध्याकाळी 7.45 वा. समारंभासाठी घरातील सर्व लोक बाहेर गेले होते व ते रात्री 11.30 वा. परत आले असता सदर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

घरात कुणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरील खिडकी फोडून आत प्रवेश केला व तळमजला व पहिल्या मजल्यावरील बंद खोल्यांचे दार फोडून आत प्रवेश करत कपाट फोडून दागिने व रोख रक्कम लांबवल्याचे युसूफ शेख यांची मुलगी रुबिना शेख यांनी सांगितले.

चोरी
MLA Vijay Sardesai : मायनिंगप्रमाणे मनोरंजन उद्योगही बंद करण्याचा सरकारचा घाट

घरात लग्न समारंभ असल्याने दागिने व लोकांचे बिल देण्यासाठी ठेवलेले होते. हे सर्व पैसे चोरट्यांनी चोरून नेल्याचे शेख कुटुंबीयांनी सांगितले. सदर घटनेविषयी कुडचडे पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते.

चोरी
SBI Fraud Case: गोव्यात बॅंक खातेदारास बोगस कॉलद्वारे तब्बल '91' हजारांचा गंडा

घरातील सर्व दागिने व पैसे चोरीला गेल्याने शेख कुटुंबीय जबरदस्त धक्क्याखाली आहेत. घरात लग्न असल्याने बऱ्याच लोकांनी घरात ये जा असल्याने संशय कोणावर घ्यावा असा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे. ही चोरी घरात दागिने व पैसे कुठे होते याची माहिती असलेल्यांकडूनच झाल्याचे शेख कुटुंबीयांनी सांगितले. याप्रकरणी कुडचडे पोलीस पूढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com