Manohar Parrikar: 'मिस्टर क्लीन' मनोहरभाई; अटल सेतू, झुआरी पूल ते मोपा विमानतळाचे जनक

Manohar Parrikar Birth Anniversary: पर्रीकर हे अभियंते तसेच अभ्यासूवृत्तीचे असल्याने त्यांचा कुणीच हात धरू शकत नव्हता. अत्यंत साधी राहणीमान आणि तल्लख बुद्धी अशी पर्रीकरांची ओळख होती.
Manohar Parrikar
Manohar ParrikarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राजकीय प्रवासात सदैव गोमंतकीय व देशाचाच विचार केला. त्यामुळेच त्‍यांची प्रतिमा ते हयात असताना आणि मृत्यूपश्‍‍चात कायम पांढऱ्या शुभ्र रंगासारखी स्वच्छच राहिली. पर्रीकरांच्या याच गुणामुळे आणि संवेदनशीलतेमुळे ते चारवेळा मुख्यमंत्री आणि सुमारे दोन वर्षे देशाच्या संरक्षणमंत्रिपदी राहिले. पर्रीकर हे द्रष्टे नेते होते. त्याचा अनुभव आज गोमंतकीय घेताहेत, असे भाजपचे उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर यांनी सांगितले.

पर्रीकर यांच्‍या दूरदृष्टीमुळे गोव्याच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल पाहायला मिळाले. मांडवी नदीवरील अटल सेतू असो, झुआरी पूल असो किंवा मोपा येथील मनोहर विमानतळाची पायाभरणी पर्रीकरांच्या नेतृत्वाखालीच झाली. शिवोली-चोपडे पूल देखील पर्रीकरांमुळेच अस्तित्वात आला. त्यानंतर पेडणे तालुक्याच्या विकासाला उत्तुंग चालना मिळाली, असेही खोलकर अभिमानाने सांगतात.

पर्रीकर हे अभियंते तसेच अभ्यासूवृत्तीचे असल्याने त्यांचा कुणीच हात धरू शकत नव्हता. अत्यंत साधी राहणीमान आणि तल्लख बुद्धी अशी पर्रीकरांची ओळख होती. नियोजनबद्ध काम व अंमलबजावणीत ते तरबेज होते. त्यांची ही खासियत गोमंतकीयांना भावली होती. भारतीय राजकारणात पर्रीकर यांची ओळख ही ‘मिस्टर क्लीन’ अशीच होती.

अत्यंत साधे व सामान्य जीवन जगणारे मनोहर पर्रीकर हे जनतेशी जोडले गेले. नेहमीच हाफ शर्ट घालून ते उच्चपदावर विराजमान झाल्यानंतर देखील त्यांच्या राहणीमानात किंचितही बदल झाला नाही, असे सांगत खोलकरांनी पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा दिला.

Manohar Parrikar
Manohar Parrikar Life Journey : उत्तमा आत्मना ख्याताः ! RSS ते गोव्याचे मुख्यमंत्री, पर्रीकरांचा जीवनप्रवास

२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर याच काळात त्यांच्यावर संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला होता.

पर्रीकरांमुळेच ‘वन रँक, वन पेन्शन’ योजना अमलात आली. याचा २१ लाख सैनिकांना फायदा झाला. हा खितपत पडलेला जटील विषय पर्रीकरांनी आपल्या संरक्षणमंत्रिपदाच्या कारर्किदीत मार्गी लावला.

Manohar Parrikar
Manohar Parrikar Life Journey : उत्तमा आत्मना ख्याताः ! RSS ते गोव्याचे मुख्यमंत्री, पर्रीकरांचा जीवनप्रवास

त्याचप्रमाणे, अनेक सामाजिक योजना त्यांनी राबवत, त्या अमलात आणल्या. सामाजिक योजनेचे पैसे गोरगरीब व वयस्कर मंडळींच्या थेट बँक खात्यात जमा करण्याची तरतूद पर्रीकरांमुळे अमलात आली.

या सुविधेचा फायदा सर्वसामान्यांना करून देणारे पर्रीकर हे पहिले मुख्यमंत्री बनले. तसेच गोव्यातील टॅक्सीचालकांना नवीन वाहने खरेदी करण्यासाठी त्यांनी खास योजना राबविली. यातूनच पर्रीकरांची सामान्यांसाठी असलेली तळमळ तसेच संवेदनशीलता अधोरेखित होते, असे खोलकर म्हणाले.

दत्तप्रसाद खोलकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com