गोंयचो आवाज: अटल सेतूच्या चौकशीसाठी ‘GSIDC’ला पाठवले पत्र

इंजिनिअरिंगमधील चमत्कार, असा अटल सेतू पुलाचा गाजावाजा करण्यात आला होता.
अटल सेतू
अटल सेतूDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अटल सेतूची (Atal setu) धक्कादायक व झपाट्याने होणारी दुरवस्था होत आहे. हा पूल सतत बंद अवस्थेत राहिल्याने पुलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. त्‍यामुळे या पुलाच्‍या कामाची चौकशी व्‍हावी, अशी मागणी गोंयचो आवाज पक्षाने (GOENCHO AWAZ) केली आहे. पक्षाने या संदर्भात ''जीएसआयडीसी''ला (GSIDC) पत्र लिहिले आहे.

इंजिनिअरिंगमधील चमत्कार, असा या पुलाचा गाजावाजा करण्यात आला होता. तो पूल सध्या खराब देखरेखीच्या कामाचे उदाहरण बनत चाललेला आहे, याकडे पक्षाकडून लक्ष वेधण्यात आले आहे. पूल वाहतुकीसाठी खुला केल्याच्या दोन वर्षांनंतरच पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे पुलाच्या जुने गोवे-पर्वरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यंदा मार्चमध्ये 4 दिवस पूल बंद ठेवण्यात आला होता, ही बाब लज्जास्पद आहे. ''एल ॲण्‍ड टी'' कंपनीला पुलातील त्रुटी सुधारण्यास सांगण्याची ही पहिलीच वेळ नाही. एप्रिल 2020 मध्येही मेरशीची बाजू सदोष सापडल्याने रस्ता दुरुस्त करण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती, याची आठवण ''गोंयचो आवाज''ने करून दिली आहे.

अटल सेतू
Goa: विद्यार्थ्यांना मोफत वायफाय, मोबाईल द्या

यंदा मे महिन्यामध्ये अटल सेतूचा दक्षिणेकडील बाजूचा रॅम्‍प पुन्हा एकदा बुडू लागला होता. त्यावेळी ''जीएसआयडीसी''ला या ''वार्षिक समस्येवर'' कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी ''एल ॲण्‍ड टी''ला सांगावे लागले होते. पुलाचा हा भाग तीन महिने बंद ठेवावा लागला होता. यावरून ''जीएसआयडीसी'', त्यांचे सल्लागार ''टीपीएफ इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड'' आणि कंत्राटदार कंपनी यांनी मेरशीच्या बाजूच्या रॅम्पच्या बांधकामासाठी पाणथळ जागा का निवडली हा प्रश्न समोर येतो, असे पक्षाने पत्रात नमूद केले आहे.

अटल सेतू
Goa: ऐपत असलेल्याना सर्वांनाच दानत नसते; साहित्यिक रवींद्र चोडणकरांचे प्रतिपादन

ऑडिटही करावे

अटल सेतूच्या स्थापनेवेळी यासाठी 385 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. प्रत्यक्षात आजपर्यंत सार्वजनिक तिजोरीतून सुमारे 581 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे आणि हे काम अद्याप पूर्ण झालेले दिसत नाही. किमतीत 10 टक्क्यांपेक्षा जास्त झालेली कोणतीही वाढ न्याय्य असणे आवश्यक आहे आणि सामान्यतः यासाठी ऑडिट आवश्यक असते. या प्रकरणामध्ये नियमांचे पालन केले गेले आहे का, असा प्रश्न पक्षाने उपस्‍थित केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com