Goa: ऐपत असलेल्याना सर्वांनाच दानत नसते; साहित्यिक रवींद्र चोडणकरांचे प्रतिपादन

कोरगाव पंचायत क्षेत्रातील वयोवृधाना काठीचा आधार देणाऱ्या खास काठ्या नागरिकांना पुरवण्याचा उपक्रम कोरगाव येथे आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.
वयोवृधांना काठीचा आधार
वयोवृधांना काठीचा आधार Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: माणसाने माणसाना आधार द्यायला हवा, एकमेकाना सहाय्य करून हे उर्वरित जीवन सर्वाना आनंदमय व्हावे यासाठी प्रयत्न व्हायला हवा. ऐपत असलेल्यांना सर्वांनाच दान करण्याची दानत नसते. परतू मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांच्या रुपात वयोवृधाना काठीचा आधार देवून एक चांगला उपक्रम राबवल्याचे उद्गार साहित्यिक रवींद्र चोडणकर यांनी कोरगाव येथे काढले.

कोरगाव पंचायत क्षेत्रातील वयोवृधाना काठीचा आधार देणाऱ्या खास काठ्या नागरिकाना पुरवण्याचा उपक्रम कोरगाव येथे आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मगोचे जीत आरोलकर, प्रवक्ते उमेश तळवणेकर, राजेश्वरी चोडणकर आदी उपस्थित होते.

वयोवृधांना काठीचा आधार
वयोवृधांना काठीचा आधार Dainik Gomantak

साहित्यिक रवींद्र चोडणकर यांनी पुढे बोलताना दानत हि जन्मताच असावी लागते. त्यामागे कोणताही स्वार्थ असू नये. कुणालातरी आपल्यातील एक वाटा देवून त्यांच्या जीवनातील समृद्धीचा आनंद घ्यायला हवा. जीवनात जे आहे ते मिळते प्रत्येकजण आपले आई वडील आपल्या मुलासाठी कार्य करतात त्याला मोठा बनवण्याचा प्रयत्न करतो. परतू कधी कधी ते घडत नाही. जे जे आहे ते ते जन्माला आल्यावर आणि गेल्यावर घेवून जात नाही. त्यामुळे जे जे आपल्याकडे आहे त्यातला एखादा वाटा गरजवंतांच्या उपयोगी यावा असे चोडणकर यांनी सांगितले

वयोवृधांना काठीचा आधार
Goa: "पेडणे राज्यातील आदर्श मतदारसंघ घडविण्यासाठी सहकार्य करा "

खोटी आश्वासन देणार नाही: प्रवीण आर्लेकर

मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना आपण कुणालाच कधीच खोटी आश्वासने देणार नाही., जे आपल्याकडे होईल त्याच विषयी आपण शब्द देतो. नागरिकांनी आपणास एक संधी देवून मतदारांची सेवा करण्यास साथ देण्याचे आवाहन यावेळी प्रवीण आर्लेकर यांनी केले. यावेळी वयोवृधाना खास काठ्या वितरीत केल्या. प्रवक्ते उमेश तळवणेकर यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com