

पर्वरी: भारताच्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक इतिहासाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे एक तेजस्वी अध्याय होते, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी केले.
साल्वादोर द मुंद पंचायत सभागृहात भाजपच्या पर्वरी मंडळातर्फे आयोजित, अटल स्मृती संमेलनाला उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना खंवटे बोलत होते. त्यांच्यासमवेत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, पेन्ह द फ्रान्स सरपंच सपनील चोडणकर, पेन्ह द फ्रान्स जिल्हा पंचायत सदस्य संदीप साळगावकर, सुकूरचे जि.पं. सदस्य अमित अस्नोडकर, पर्वरी मंडळ भाजप अध्यक्ष विनीत परब, पर्वरी भाजप प्रभारी रूपेश कामत, भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते.
अटलजी हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते म्हणजे एक विचारधारा, मूल्यप्रणाली आणि चैतन्याने भरलेली प्रेरणा होते. अटलजी सभ्य राजकारणाचा आदर्श नमुना होते, असे खंवटे यांनी सांगितले. यावेळी संदीप साळगावकर व अमित अस्नोडकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच अटलजींच्या काळातील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक विनयकुमार मंत्रवादी, गजेंद्र सिंग, किरण प्रसाद, दिना कर्पे, चंद्रहास नारायण व गीता माळगावकर यांचाही सत्कार करण्यात आला. मंडळ अध्यक्ष परब यांनी स्वागत तर रिना फर्नांडिस यांनी आभार मानले. सूरज प्रभुदेसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
विरोधकांचाही सन्मान करणारे, संसदेला संवादाचे पवित्र मंदिर मानणारे आणि राजकारणात भाषा व वर्तनाची मर्यादा जपणारे, असे अटलजी एक आदर्श नेते होते. त्यांनी भारताला नव्या आत्मविश्वासाची दिशा दिली. १९९८ मध्ये पोखरण येथे झालेल्या अणुचाचण्यांमुळे भारत अणुशक्ती संपन्न राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला. हा निर्णय धाडसी होता, पण देशहितासाठी आवश्यक होता, असे खंवटे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.