Atal Bihari Vajpayee: विकासप्रक्रियेत 'वाजपेयीं'चे योगदान उल्लेखनीय! भाजपतर्फे माजी पंतप्रधानांना आदरांजली

Atal Bihari Vajpayee's Birth Anniversary: दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी यांच्या प्रेरणेतूनच भाजपच्या नेतृत्वाखाली देश विधायक दिशेने मार्गक्रमण करीत आहे, असे प्रतिपादन आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केले.

Atal Bihari Vajpayee's Birth Anniversary In Goa

डिचोली: दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे एक गुणी आणि विचारवंत नेते होते. संयमी वृत्तीमुळे विरोधकांनाही ते आपलेसे वाटत होते. वाजपेयी यांचे देशाच्या विकास प्रक्रियेत मौलिक योगदान आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच भाजपच्या नेतृत्वाखाली देश विधायक दिशेने मार्गक्रमण करीत आहे, असे प्रतिपादन आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केले.

दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार शेट बोलत होते. प्रत्येकाने वाजपेयी यांचे विचार आत्मसात करुन देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सहकार्य केले, तर ती त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल, असे मतही आमदार शेट यांनी व्यक्त केले.

मये भाजप मंडळातर्फे कुंभारवाडा येथील भानुमती शेट सभागृहात आज (बुधवारी) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, मये भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, आरती बांदोडकर, मयेचे सरपंच कृष्णा चोडणकर, पिळगावची सरपंच मोहिनी जल्मी, शिरगावची सरपंच वेदिका शिरगावकर यांच्यासह विविध पंचायतींचे पंचसदस्य तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. आमदार शेट यांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. नंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com