Atal Asra Scheme: घर बांधणीसाठी 4, तर दुरुस्‍तीसाठी 2 लाखांपर्यंतच्‍या अनुदानाचा प्रस्‍ताव; अटल आसरा, साडेचार वर्षांत 5,075 जणांना लाभ! फळदेसाई

Atal Asra Scheme Goa Latest: आमदार प्रेमेंद्र शेट आणि नीलेश काब्राल यांनी प्रश्‍‍नोत्तराच्‍या तासाला याबाबतचा प्रश्‍‍न उपस्‍थित केला होता.
Atal Asra Scheme Goa Latest
Atal Asra SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: समाजकल्‍याण खात्‍याच्‍या ‘अटल आसरा’ योजनेअंतर्गत नवे घर बांधण्‍यासाठीचे अनुदान तीनवरून चार लाख आणि घराच्‍या दुरुस्‍तीसाठीचे अनुदान दोन लाखांपर्यंत वाढवण्‍याचा प्रस्‍ताव राज्‍य सरकारला सादर करण्‍यात आला आहे, असे खात्‍याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी बुधवारी विधानसभा सभागृहात बोलताना स्‍पष्‍ट केले.

आमदार प्रेमेंद्र शेट आणि नीलेश काब्राल यांनी प्रश्‍‍नोत्तराच्‍या तासाला याबाबतचा प्रश्‍‍न उपस्‍थित केला होता. ‘अटल आसरा’ योजनेसाठी पंचायत परिसरातील नागरिकांना गटविकास अधिकारी (बीडीओ) आणि पालिका क्षेत्रातील नागरिकांना मुख्‍याधिकाऱ्यांना अर्ज सादर करावा लागतो. परंतु मुख्‍याधिकाऱ्यांना पुन्‍हा तो ‘बीडीओं’ना सादर करावा लागतो.

Atal Asra Scheme Goa Latest
Goa Casino: 'हे तर होणारच होते, पुढेही होतच राहणार!' कॅसिनोच्या विळख्यात बदललेल्या गोव्याची अस्वस्थ करणारी कहाणी

पदानुसार मुख्‍याधिकारी ‘बीडीओं’पेक्षा मोठे असतात. त्‍यामुळे त्‍यांच्‍यात अंतर्गत हेवेदावे होऊन अनेक अर्ज प्रलंबित राहतात. नागरिकांना थेट समाजकल्‍याण खात्‍याच्‍या उपसंचालकांकडे अर्ज सादर करता येईल अशी व्‍यवस्‍था तयार करावी, अशी मागणी आमदार काब्राल यांनी केली.

त्‍यावर बोलताना, ‘अटल आसरा’चे अर्ज नागरिकांनी थेट समाजकल्‍याण खात्‍याच्‍या उपसंचालकांकडे पाठवण्‍याचा प्रस्‍तावही आपण मांडलेला आहे. त्‍यावर महिनाभरात निर्णय होईल. शिवाय यापुढे योजनेअंतर्गत नवे घर बांधणाऱ्यांना चार लाख, तर घराच्‍या दुरुस्‍तीसाठी अर्ज केलेल्‍यांना दोन लाखांपर्यंतचे अनुदान देण्‍यात येईल. गेल्‍या साडेचार वर्षांच्‍या काळात ‘अटल आसरा’अंतर्गत एकूण ५,०७५ अर्जांना खात्‍याने मंजुरी दिली असून आत्तापर्यंत ६५ कोटींचा निधी मंजूर करण्‍यात आला आहे, असे फळदेसाई म्‍हणाले.

Atal Asra Scheme Goa Latest
Goa Administration: एक अधिकारी, अनेक खाती! 122 सरकारी अधिकाऱ्यांवर अतिरिक्त खात्यांचा भार; भरती-पदोन्नती सुरु असल्याचा सावंत सरकारचा दावा

‘अटल आसरा’ योजनेअंतर्गत अर्ज सादर केलेल्‍या अनेकांना पहिला हप्‍ता मिळाला. परंतु, त्‍यातील अनेकांनी या पैशांचा वापर घर बांधण्‍यासाठी किंवा दुरुस्‍तीसाठी न करता ते पैसे वेगळ्याच कारणासाठी वापरल्‍याचे समोर आले आहे. अशांच्‍या छाननीचे काम खात्‍याकडून सुरू असून, त्‍यांच्‍याकडून लवकरच वितरित केलेले पैसे वसूल केले जातील, असेही फळदेसाई यांनी स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान, ‘अटल आसरा’ योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज सादर करता येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com