Assagao Demolition Case: पूजा शर्माने आगरवाडेकर कुटुंबीयांवर दाखविली दया; पोर्तुगीज कायद्याचा हवाला

Pooja Sharma: मालमत्तेत अतिक्रमण करणाऱ्याला स्वतः किंवा न्यायालयाच्या माध्यमातून हद्दपार करण्याचा अधिकार आहे असा युक्तिवाद वकिलांनी गोवा खंडपीठात केला आहे
Assagao House Demolition Case: मालमत्तेत अतिक्रमण करणाऱ्याला स्वतः किंवा न्यायालयाच्या माध्यमातून हद्दपार करण्याचा अधिकार आहे असा युक्तिवाद वकिलांनी गोवा खंडपीठात केला आहे
Assagao DemolitionDainik Gomantak
Published on
Updated on

आसगाव येथे प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्याचा बेकायदेशीर प्रयत्न झाल्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. आता ही मालमत्ता विकत घेणारी पूजा शर्मा हिला पोर्तुगीज नागरी संहितेच्या कलम ४८६ नुसार मालमत्तेत अतिक्रमण करणाऱ्याला स्वतः किंवा न्यायालयाच्या माध्यमातून हद्दपार करण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात केला आहे.

तिने तसे न करता पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडे तक्रार केली होती, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

मालमत्ता विकत घेताना अमूक यांची मुलगी असा उल्लेख करणाऱ्या पूजा हिने न्यायालयाने पासपोर्ट जमा करण्याचा आदेश दिल्यावर मात्र आपण भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले आहे.

Assagao House Demolition Case: मालमत्तेत अतिक्रमण करणाऱ्याला स्वतः किंवा न्यायालयाच्या माध्यमातून हद्दपार करण्याचा अधिकार आहे असा युक्तिवाद वकिलांनी गोवा खंडपीठात केला आहे
Goa Assagao House Demolition: संबंध नाहीच तर घर दुरुस्‍तीचे आश्‍‍वासन का दिले?

...याचा पूजाला लाभ

आगरवाडेकर यांच्या पत्नीने तक्रारीत पूजा यांचे नाव घेतले असले, तरी त्यांची घर पाडण्याच्या प्रकरणात नेमकी भूमिका काय, हे स्पष्ट केले नव्हते. ‘एफआयआर’मध्येही पूजा यांचे नाव नोंदविले नाही. घर पाडले त्यावेळी २२ जून रोजी त्या गोव्यात आल्या नव्हत्या, असेही त्यांच्या वकिलाने न्यायालयात नमूद केले.

गोव्याबाहेरून येऊन कोणीही पोर्तुगीज नागरी संहितेचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. ही तरतूद गोमंतकीयांसाठीच आहे. तिचा गैरवापर गोमंतकीयांना मालमत्तेतून बेदखल करण्यासाठी केला जाऊ नये.

ॲड. आल्बर्टिना आल्मेदा, समाज कार्यकर्त्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com