Minister Vishwajeet Rane: सर्व घटकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणे आवश्‍यक!

Minister Vishwajeet Rane: विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ
 Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Minister Vishwajeet Rane: विकसित भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. 2047 पर्यंत आपल्या देशाची गणना विकसित राष्ट्रांमध्ये व्हावी यासाठी सर्वांनी सरकारला पूर्ण सहयोग दिला पाहिजे, असे आवाहन करीत नगरविकासमंत्री विश्‍वजीत राणे यांनी रविवारी दोनापावला येथे विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.

 Vishwajeet Rane
Goa Police: स्मशानभूमीवरून पारोड्यात पेटला वाद

पणजी महानगरपालिका आणि राज्यातील सर्व 13 नगरपालिका क्षेत्रांमधून 23 दिवस ही यात्रा फिरणार आहे. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांबद्दल शहरी भागातील जनतेमध्ये जागृती निर्माण करणे हा या यात्रेचा उद्देश आहे. ही व्हॅन दिवसातून दोन ठिकाणी भेट देईल, अशाप्रकारे राज्यातील 46 ठिकाणांना भेट देणार आहे.

याप्रसंगी राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. मच्छीमार, शेतकरी, उद्योजक अशा समाजातील सर्व घटकांच्या फायद्यासाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत.

आरोग्य क्षेत्रात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या, कर्करोग तपासणी यासह विविध आरोग्य सेवा योजना राबविल्या आहेत. विकसित भारत यात्रा शहरी भागातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे.

विकसित भारताची शपथ

केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पोहोचवली जाणार असल्याचे नगरविकास विभागाचे संचालक गुरुदास पिळर्णकर म्हणाले. याप्रसंगी मंत्री राणे आणि पिळर्णकर यांनी उपस्थितांसह विकसित भारताची शपथ घेतली. या कार्यक्रमात दूरदर्शन केंद्र पणजीचे उपसंचालक रविराज सतापे, ऑल इंडिया रेडिओ पणजीचे उपसंचालक तुषार जाधव, कॅरेन मोंतेरो आणि बालाजी केंद्रे उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com