Ashadhi Ekadashi 2023 : साळ पुनर्वसन विद्यालयाची ‘वारी’; मुलांनी जाणले वारीचे महत्त्व

सांस्कृतिक, सामाजिक उत्सव : वारीदरम्यान सर्व स्तरातील भाविक एकत्र येऊन विविध शहरे आणि खेड्यांपासून पंढरपूरपर्यंत सुमारे 425 ते 450 किलोमीटरचे अंतर कापून पायी प्रवास करतात.
Ashadhi Ekadashi 2023
Ashadhi Ekadashi 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Sal : आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व असलेल्या अध्यात्मिक तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या वारीची माहिती मुलांना समजण्यासाठी सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसन साळ येथे ‘वारी’ या मथळ्याअंतर्गत गुरुवारी (ता.29) उपक्रम आयोजित केला होता. ही वारी साळ पुनर्वसन विद्यालय ते श्री गणेश मंदिर अशी पार पडली. पंढरपूर वारी ही एक वार्षिक तीर्थयात्रा आहे जी महाराष्ट्र राज्यात विशेषतः पंढरपूर शहरात होते. वारीदरम्यान सर्व स्तरातील भाविक एकत्र येऊन विविध शहरे आणि खेड्यांपासून पंढरपूरपर्यंत सुमारे 425 ते 450 किलोमीटरचे अंतर कापून पायी प्रवास करतात.

ते त्यांच्यासोबत ‘पालखी’ घेऊन जातात ज्यात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या पावलांचे ठसे असतात. वारी काय असते याचा प्रत्यय येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले, असे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील यांनी सांगितले. या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक धाकटू पाटील, शिक्षक संकेत नाईक, शिक्षिका स्मिता राऊळ, शाळा व्यावस्थापन समितीचे सदस्य, पालक-शिक्षक संघाचे सदस्य, साळ पुनर्वसन महिला वर्ग, ग्रामस्थ व साळाचे माजी पंचसदस्य देविदास नाईक उपस्थित लावली होती.

Ashadhi Ekadashi 2023
Sal Dam : मॉन्सूनपूर्व विकेंडला साळ बंधाऱ्यावर पर्यटकांची गर्दी

एकतेची भावना वाढते वारी हा केवळ धार्मिक सोहळाच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सवही आहे. हा लोकांना एकत्र आणतो. एकता आणि समुदायाची भावना वाढवतो. वारी आपल्याला नम्रता, भक्ती आणि समर्पणाची मूल्ये शिकवते, असे उद्‌गार लोकांच्या मुखातून निघत होते. वारीचे सांस्कृतिक महत्त्व, समृद्ध वारशाबद्दल जाणून घेण्यासाठी आणि पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या परंपरा समजून घेण्यासाठी हा उपक्रम शाळेतर्फे आयोजित केला होता.

Ashadhi Ekadashi 2023
Polluted River Sal: नद्या वाचवूया; सुखी, समृद्ध होऊया

चैतन्यमय वातावरण

शाळेच्या वारीचे वातावरण कमालीचे चैतन्यमय आणि भक्तिभावाने भारलेले होते. पालकांच्या जोडीने गावातील ग्रामस्थ भजन (भक्तिगीते) आणि गजरांच्या तालात, रस्त्यावर झेंडे, तुळस, टाळ घेऊन पारंपरिक पोशाख घालून सजले होते. बाल वारकऱ्यांनी रांगेत दिंडी सादर केली. विद्यार्थ्यांबरोबर पालक व ग्रामस्थ, पुनर्वसन महिला मंडळ यांची एकता आणि सामूहिक भावनेचे साक्षीदार हे एक सुंदर दृश्य साळ पुनर्वसन वाड्यावर पाहायला मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com