अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल

ते गोव्यातील (Goa) 'आप' कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणुकीची रणनीती आणि पक्ष बळकटीकरण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना करणार आहेत, असे आम आदमी पक्षातर्फे कळवण्यात आले.
Delhi Chief Minister Arvind Kejriwal
Delhi Chief Minister Arvind KejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आज गोव्यात दुपारी .30 वाजता दाबोळी विमानतळावर आगमन झाले.यावेळी त्यांच्या स्वागतासाठी माजी आमदार महादेव नाईक, आपचे गोवा संयोजक राहूल म्हांब्रे, वाल्मिकी नाईक, संदेश तेलेकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आजही केजरीवाल आले हात उंचावून अभिवादन केले.हार, तुरे स्वीकारुन सरळ गाडीत जाऊन बसले व पणजीला रवाना झाले.त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते हातात घोषणा फलक घेऊन उभे होते.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal
...तर महाराष्ट्रातील वाहने अडवू

या भेटीदरम्यान ते राज्यातील आप कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणुकीची रणनिती आणि पक्ष बळकट करण्यासाठी आवश्यक त्या सूचना करणार आहेत.आम आदमी पार्टी उत्तराखंडमधील 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी हल्द्वानीमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या. घोषणांचा पाऊस पाडताना बेरोजगारांना आकर्षिक करण्यासाठी केजरीवालांनी मोठी आश्वासनं दिली आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल हे आज गोवा दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यावेळीही ते मोठ्या घोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम आदमी पार्टी सत्तेवर आल्यानंतर राज्यात 2400 युनिट वीज पुरवठा मोफत आणि 24 बाय 7 विनाखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करेल, असे आश्वासन मागील गोवा भेटीदरम्यान केजरीवाल यांनी केले होते.आज कोणती मोठी घोषणा करणार आहे यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com