Artist In Goa: तरवळे शिरोडा येथील अवलिया कलावंत येसो गणसू नाईक यांनी केवळ एकलव्य वृत्तीने निरीक्षणातून आत्मसात केलेली कला त्यांच्या जगण्याचा आधार बनली आहे. येसो यांचा हात लागताच ढोल, ताशे, पखवाज, तबला अक्षरशः सुरात बोलू लागतात.
या कलेतून घडलेले विद्यार्थी, त्यांनी तयार केलेली कलाकृती आणि त्यांच्या गायकीतून आणि वादनातून दिसून येते. येसो नाईक आता 70 वर्षाचे असले तरी तरुणांना लाजवेल, अशा जोमात ते कार्य करताना दिसतात.
एकही क्षण ते वाया घालवत नाहीत. त्यांचे शिक्षण मराठी इयत्ता चौथी पर्यंत झाले. परंतु त्यांच्या आवडीनुसार त्यांनी संगीत विशारद पर्यंत शिक्षण घेतले. सुरूवातीला त्यांनी शिमगोत्सवात रोमटामेळासाठी लागणारे साहित्य बनविण्यावर लक्ष केंद्रीत केले. रोमटामेळासाठीच आकर्षक तोरणे, अबदागीरे, छत्र्या, ढोल, दीपस्तंभ बनवून मागणी येईल त्या पद्धतीने बनवून दिले.
फोंडा तालुक्यातील गावागावातील शिमगो मांडावर येसो नाईक कडून ढोल, तासे नेतात तसेच ढोल ताशे दुरुस्त करून नेतात. श्रावणात तबला दुरुस्तीसाठी येसो नाईक यांना सवड मिळत नाही. तबल्यांना शाई घालण्याचे काम तबला डग्गा, पखवाज यांना नवीन वादी घालण्याचे काम सुरूच असते.
या कामाच्या मिळकतीवर येसो नाईक यांच्या संसार चालतो. लोकांच्या आवडी निवडीवरून तबला ढोल, ताशे, पखवाज बनवून देण्याकडे त्यांचा कल असतो. या दोन्हीही कला ते कुणाकडून शिकले नाहीत, तर स्वतःच आवडीने करू लागले, पुढे हा व्यवसाय बनला.
गायन,वादनाचे प्रशिक्षण वर्ग
येसो नाईक हे उत्कृष्ट भजन गायक तसेच तबला आणि हार्मोनियम वादक आहेत. ते उत्कृष्ट भजन अभंग गातात, म्हणून त्यांना ठिकठिकाणी त्यांना बोलावले जाते.गायन, वादन कलेचा वारसा जपण्यासाठी ते अनेक गावात भजन प्रशिक्षण वर्ग घेतात. ते तबला, हार्मोनियम आणि गायन, टाळनाद हे एकटेच शिकवतात.
यातून अर्थार्जनाची इच्छा नाही. वाद्य दुरुस्तीतून मिळणारे उत्पन्न संसाराला पुरेसे आहे. सोबत पत्नी, विवाहित मुलगा, विवाहित कन्या आहेत. यातच आपले सुख आहे, असे येसो सांगतात
...म्हणून वाद्य दुरूस्तीकडे !
राज्यातील अनेक देवस्थानात पालखी सजावटीसाठी लागणारे आभूषणयुक्त पालखीचे साहित्य, तोरणे, अबदागीरे, ढोल त्यांनी बनवून दिले आहेत. यासाठी लागणारे सर्व तऱ्हेचे साहित्य ते कोल्हापूर तसेच म्हापसा बाजारपेठेतून आणत.
पालख्या व शिमगोत्सव मांडावर सजावटीचे साहित्य बनवत होते. परंतु या साहित्याचे भाव वाढून साहित्य बनवणे खर्चिक होऊ लागल्याने ते आता बंद करून येसो नाईक यांनी आपल्या घरी ढोल, ताशे, पखवाज, तबला, डग्गे, बनवणे आणि दुरुस्तीचा व्यवसाय गेल्या कित्येक वर्षांपासून चालू ठेवला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.