Goa Crime: गोवा पोलिसांची विदेशी नागरिकांविरुद्ध मोठी कारवाई

गेल्या सहा वर्षांत विविध गुन्ह्यांखाली 618 विदेशी नागरिकांना अटक झाली आहे.
Goa Crime |Tourist Arrested
Goa Crime |Tourist ArrestedDainik Gomantak

Goa Crime: गेल्या सहा वर्षांत विविध गुन्ह्यांखाली 618 विदेशी नागरिकांना अटक झाली आहे. त्यातील 231 जणांना ड्रग्जप्रकरणी तर इतर गुन्ह्यांप्रकरणी 387 जणांना अटक झाली होती. पोलिसांनी विदेशी नागरिकांच्या बेकायदा वास्तव्यप्रकरणी तपासणी सुरू केल्यानंतर गेल्या काही वर्षात हे प्रमाण कमी झाले आहे.

बेकायदेशीर वास्तव्यप्रकरणी राज्यात 158 विदेशी नागरिकांवर कारवाई झाली आहे. त्यातील 90 टक्के उत्तर गोव्यातील आहेत.

पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये विदेशी नागरिकांमध्ये नायजेरियनची संख्या अधिक आहे. 2017 ते 2022 या काळात ड्रग्जप्रकरणी 20 नायजेरियन, 3 रशियन व 4 इस्रायली तर 10 जण इतर देशातील नागरिक आहेत.

Goa Crime |Tourist Arrested
Child Beggars: म्हापशात भिक मागणाऱ्यांची चाईल्डलाईनतर्फे सुटका

गेल्या सहा वर्षात पोलिसांच्या सिसेमिऱ्यामुळे ड्रग्जप्रकरणातील विदेशी नागरिकांची संख्या कमी झाली आहे. 2019 मध्ये 58 विदेशी नागरिकांना अटक झाली होती ती 2022 मध्ये निम्म्यावर म्हणजे 28 वर पोहचली आहे.

ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या 231 पैकी विदेशी नागरिकांमध्ये नायजेरिन्सची संख्या 118 आहे. हे नागरिक पर्यटन व्हिसावर गोव्यात येतात व त्यानंतर परत न जाता ते भारतातच आश्रय घेऊन राहत असतात.

गेल्या तीन वर्षात (2020 ते 2022) या काळात अनुक्रमे 172, 138 व 188 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये विदेशी नागरिक, भारतीय पर्यटक व गोमंतकियांचा समावेश आहे. 2002 मध्ये 36 विदेशी, 82 भारतीय व 54 गोमंतकियांना अटक झाली तर 2021 मध्ये 22 विदेशी, 87 भारतीय व 29 गोमंतकिय तसेच 2022 मध्ये 29 विदेशी, 103 भारतीय व 56 गोमंतकियांना अटक झाली होती.

बेकायदा वास्तव्यप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या विदेशी नागरिकांना म्हापसा येथील बंदिस्त केंद्रात ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. सुमारे ७०० हून अधिक विदेशी नागरिकांना बेकायदा वास्तव्यप्रकरणी भारतातून पाठवणी करण्यात आली आहे तर अजून सुमारे 50 जणांची पाठवणूक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Goa Crime |Tourist Arrested
Valpoi Garbage Issue: वाळपई-रेडेघाटात कचऱ्याचे ढीग

...यामुळे समजते माहिती

गोव्यात येणाऱ्या विदेशी नागरिकांची दाबोळी व मोपा विमानतळावर त्यांचा सी फॉर्म भरण्याची सोय करण्यात आली आहे. सर्व हॉटेल्सना सी फॉर्म भरलेल्या विदेशी नागरिकांनाच राहण्यास द्यायची सक्ती करण्यात आली आहे. ही नोंदणी ऑनलाईन केली जात असल्याने त्याची नोंद पणजीतील एफआरआरओ कार्यालयात होत आहे.

त्यामुळे गोव्यात आलेले पर्यटक जर बेकायदेशीर राहत असल्यास त्यांची माहिती यावरून मिळते व त्यानुसार कारवाई करणे सोपे होते, अशी माहिती या कार्यालयाच्या अधिकाऱ्याने दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com