Seva Pakhwada: राज्याच्या, देशाच्या प्रगतीचे चित्र उमटललेल्या कलाकृती; 21 व्या शतकातील भारत आणि गोवा प्रदर्शन

Art exhibition Goa: प्रत्येक चित्रकाराला या प्रदर्शनासाठी कला आणि संस्कृती संचालनालयाकडून विषय विस्तृतपणे दिला गेला होता (तो विषय प्रत्येक चित्राखाली आहे. दर्शक तो वाचू शकतात.)
Art exhibition Goa
Art exhibition GoaDainik Gomantak
Published on
Updated on

देशात सेवा पंधरवडा (पखवडा) चालू आहे आणि त्यानिमित्ताने कला आणि संस्कृती संचालनालयाने राज्याच्या आणि देशाच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचे निर्देशन करणारे चित्रकला प्रदर्शन कला आणि संस्कृती भवनच्या कलादालनात काल 23 सप्टेंबर पासून भरवले आहे.

गोमंतकीय चित्रकारांच्या 30 कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या गेल्या आहेत. '21 व्या शतकातील भारत आणि गोवा: २०४७- विकसित भारताच्या दिशेने' असे शीर्षक असलेल्या या प्रदर्शनात गोव्यातील आघाडीच्या चित्रकारांची चित्रे आपल्याला दिसतील. हे चित्रकला प्रदर्शन 27 सप्टेंबर पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत लोकांना पाहण्यासाठी खुले असेल. 

प्रत्येक चित्रकाराला या प्रदर्शनासाठी कला आणि संस्कृती संचालनालयाकडून विषय विस्तृतपणे दिला गेला होता (तो विषय प्रत्येक चित्राखाली आहे. दर्शक तो वाचू शकतात.) विषयाबरोबर त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे यांच्या सूचनाही चित्रकारांना दिल्या गेल्या होत्या. विषय चित्रात मांडण्यासाठी ३x४ फूट आकाराचा कॅनव्हास चित्रकारांना पुरवण्यात आला.

Art exhibition Goa
Serendipity Arts Festival: सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हलचा बिगुल! शुभा मुद्गल, गीता चंद्रन यांची उपस्थिती; तारखा जाणून घ्या..

गोव्याच्या आणि देशाच्या प्रगतीचे चित्र ज्यात उमटल्या असतील अशा कलात्मक कलाकृती या प्रदर्शनात असतील ही अपेक्षा या प्रदर्शनातील काही कलाकृती नक्कीच पूर्ण करतात परंतु प्रदर्शनातील बहुतांश चित्रे फार घाईघाईने केल्यासारखी वाटतात.‌

Art exhibition Goa
Konkan Farming Culture: पावसाच्या सरी, मातीचे शिंतोडे... कोकणात 'भात लावणी'चा अनुभव घेताना जाणवतो जीवनाचा खरा गोडवा!

ती ठळकपणे प्रचारात्मक आहेत हा भाग तर झालाच परंतु ज्या नामवंत चित्रकारांनी ती रंगवली आहेत त्या चित्रकारांची अस्सल शैलीही त्यात उमटलेली नाही. या संबंधात काही चित्रकारांकडे बोलल्यानंतर कळले की त्यांना चित्रे पूर्ण करण्यासाठी आणि ती प्रदर्शनात मांडण्यासाठी केवळ चार-पाच दिवसच दिले गेले होते- काही चित्रकारांना तर दोनच दिवस मिळाले‌ त्यामुळे घाईघाईने त्यांना त्यांच्या कलाकृती पूर्ण करण्याचे काम करावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com