वेळींग-प्रियोळ पंचायतीवर गोविंद गावडेंच वर्चेस्व कायम

निस्वार्थी काम करणाऱ्यांना जनता कायम साथ देते
MINISTER GOVIND GAUDE
MINISTER GOVIND GAUDEDainik Gomantak
Published on
Updated on

सत्ताधारी भाजपने बहुतांश पंचायतींमध्ये आपल्या समर्थकांना विविध अर्थाची रसद पुरवली असून भाजपचेच पण सरपंच आणि उपसरपंच निवडून येतील याची काळजी घेतली आहे. यासाठी मंत्री, आमदारांबरोबर कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहे. बहुतांश पंचायतींमधील पदे निश्चिती झाली असून आज सोमवारी सकाळी निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर निवडी पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वेळींग-प्रियोळ पंचायतीच्या निवडी ही पार पडल्या.

(ART & CULTURE MINISTER GOVIND GAUDE supremacy over Waring-Priyol Panchayat)

MINISTER GOVIND GAUDE
Giriraj Vernekar : विजय सरदेसाई यांचा आरोप दिशाभूल करणारा

यावेळी राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी या निवडीनंतर बोलताना म्हणाले की, राजकारणात आज निस्वार्थीपणे काम करणाऱ्यांची गरज आहे. तसेच आसपासच्या ग्रामपंचायत क्षेत्रांचा ज्या प्रमाणे विकास झाला आहे. त्याप्रमाणे आपल्या ही क्षेत्राची, आसपासच्या परिसराची, सामान्य नागरिकांची प्रगती होणे आवश्यक आहे. सध्या सूरु आहेच. मात्र याचा वेग वाढवून जनसामान्यांचे जीवन आणखी सुखकर होण्यासाठी आपण प्रयत्न करुया असे ही ते म्हणाले.

MINISTER GOVIND GAUDE
Silly Souls Case : ‘सिली सोल्स’ परवान्यासंदर्भात आज सुनावणी

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, मार्शल सारख्या परिसरात अनेक धर्मीयांची प्रार्थना स्थळे आहेत. या क्षेत्रांचा ही विकास होण्यासाठी विशेष प्रयत्न करुया असं ही ते म्हणाले. या प्रमाणेच सर्वांशी मिळून - मिसळून काम करुया म्हणजे काम करणे अधिक सोपं होईस असे ही ते यावेळी म्हणाले.

राज्यातील 186 पंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचाची झाली निवड

राज्यातील 186 पंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड आज सोमवारी होत आहे. 186 मधील 140 पेक्षा जास्त पंचायतींवर सत्ताधारी भाजपने दावा ठोकला असून या पंचायतींवर आमचे सरपंच निवडून येतील असे यापूर्वी जाहीर केले आहे. एकंदर राज्यभरातील पंचायत निवडणुकांचा आढावा घेतला असता हीच परिस्थिती दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com