Medical Admission साठी 10 लाखांचा गंडा घालणाऱ्याला झारखंडमध्ये अटक

गेल्या वर्षी नावेली येथील तक्रारदाराने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फेसबुकवर असलेल्या एका व्यक्तीशी संपर्क साधला होता.
Medical Admission
Medical Admission Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बोगस वैद्यकीय महाविद्यालयीन (Medical college admission) प्रवेश देऊन 10 लाखांचा गंडा घालणाऱ्या झारखंड (Jharkhand) येथील आशुतोष कुमार या तरुणाला सायबर (Cyber Crime) कक्षाच्या पोलिस पथकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपास करत झारखंड येथे जाऊन शिताफीने अटक केली. त्याला पाच दिवसांची कोठडी बजावण्यात आली आहे. त्याने लुबाडलेल्या पैशाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या वर्षी नावेली येथील तक्रारदाराने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फेसबुकवर असलेल्या एका व्यक्तीशी संपर्क साधला होता. त्याने त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार या अनोळखी व्यक्तीने बोगस ईमेल पत्ता तयार करून तसेच बोगस नावाने बँक अकाऊंट तयार केला. तक्रारदाराला बंगळुरू येथील बी. आर. आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालयातून ईमेल आल्याचे भासवले व त्याच्या मुलाला प्रवेश मिळाल्याची माहिती दिली.

Medical Admission
Goa: रक्षाबंधनाची गोडी वाढवताहेत स्वयंसाहाय्य गट

त्यासाठी लगेच 10 लाख रुपये ईमेलवर दिलेल्या बँक अकाऊंटमध्ये जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराने क्षणाचाही विलंब न करता ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा केले. ईमेलवर आलेले पत्र घेऊन तो बंगळुरू येथील आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालयात गेला असता हे पत्र बनावट असल्याचे सांगण्यात आले. महाविद्यालयाकडून प्रवेश मिळाल्याचे कोणतेच पत्र ईमेलने पाठवले नसल्याचे सांगण्यात आले.

तक्रारदार गोव्यात परतला व संशयिताने 10 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार सायबर कक्षाकडे 20 डिसेंबर 2020 रोजी दाखल केली होती. तेव्हापासून या कक्षाचे पोलिस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशयिताचा शोध घेत होते. संशयिताची माहिती मिळाल्यावर झारखंड येथील पोलिसांची मदत घेण्यात आली. त्याच्या पत्त्यावर सायबर कक्षाचे पथक उपनिरीक्षक सर्वेश सावंत व पोलिस कॉन्स्टेबल बसूराज अडपड, विराज नार्वेकर यांनी झारखंड येथे जाऊन त्याला अटक केली.

Medical Admission
Goa: फुकट पाणी देण्याऐवजी नोकऱ्या द्या - एल्विस गोम्स

बँक अकाऊंट आणि ईमेल बनावट

संशयित आशुतोष कुमार हा झारखंड येथील असून त्याने अर्ध्यावरच महाविद्यालयीन शिक्षण सोडले आहे. त्याच्याविरुद्ध झारखंड येथे एकही गुन्हा नोंद नाही. त्याने तक्रारदाराला वैद्यकीय प्रवेश मिळाल्याचे पत्र संबंधित महाविद्यालयाच्या नावाने करून ईमेल केले होते. त्यानंतर समीरज राजहंस या व्यक्तीच्या नावाने बँक अकाऊंट उघडले होते. त्यासाठी लागणाऱ्या ओळखपत्रावर छायाचित्रही लावले होते. त्यानंतर त्याने या बँक अकाऊंटवरून दहा लाखाची रक्कम उकळली होती. चौकशीत ही रक्कम त्याने खर्च केल्याचे सांगत असला तरी त्याचा तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com