Old Goa Police: नोकरीचे आमिष दाखविणाऱ्यास अटक, जुने गोवे पोलिसांची कारवाई

या आमिषाला बळी पडलेल्या मयूर कुंकळकर याने पोलिसांत तक्रार दाखल केली
Old Goa Police
Old Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Old Goa Police परदेशात तसेच प्रवासी बोटींवर नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून सुमारे 13 लाखांना गंडा घालणाऱ्या अहमदनगर येथील अनिकेत गायकवाड (25) या युवकाला जुने गोवे पोलिसांच्या पथकाने मुलुंड-मुंबई येथे अटक केली.

त्याला पोलिस कोठडी घेण्यात आली असून त्याचा साथीदार सावियो डिसिल्वा यालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे ठरविले आहे.

याप्रकरणी संशयितांच्या या आमिषाला बळी पडलेल्या मयूर कुंकळकर याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संशयिताने गोव्यातील सुमारे 100 हून अधिक जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे, असे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी सांगितले.

Old Goa Police
Goa IAS-IPS Officer Transfer: गोव्यातील 'या' आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

संशयित अनिकेत गायकवाड याने खोर्ली येथील सावियो डिसिल्वा याच्याशी दोस्ती केली. तो परदेशात तसेच प्रवासी बोटीवर गलेलठ्ठ नोकऱ्या उपलब्ध करून देतो, असे सांगितले व या नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांना गाठण्यासाठी सावियो याची मदत घेतली.

त्यानुसार सावियो याने गोव्यातील काही तरुणांशी संपर्क साधला. काहींनी पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम परदेशात चांगल्या नोकरीसाठी संशयिताकडे दिली होती.

काही दिवसांनी संशयित अनिकेत गायकवाड हा गोव्यातून पसार झाला व त्यानंतर ज्या युवकांनी परदेशातील नोकरीसाठी पैसे दिले होते त्यांना संपर्क साधला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळून येत होते.

काही युवकांनी सावियो डिसिल्वा याच्याशीही संपर्क साधला. मात्र, संशयित गायकवाड याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने जुने गोवे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

Old Goa Police
Bicholim Road Issue: डिचोलीतील खोदलेला रस्ता पूर्ववत करण्याची मागणी

संशयिताच्या हालचालींवर नजर

जुने गोवे पोलिसांनी खोर्ली येथील सावियो डिसिल्वा याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीतून संशयित गायकवाड याची माहिती समोर आली. त्यानुसार दोन पोलिस पथके स्थापन करण्यात आली. संशयिताच्या हालचालींवर पाच दिवस नजर ठेवण्यात आली.

संशयित मुंबईतच असल्याची माहिती या पथकाला मिळाल्यावर पुन्हा मुंबईत येऊन देवनार पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली व ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com