‘त्या’ मास्टरमाईंडलाही अटक करा! दक्षिण गोवा भाजपच्या माजी खासदाराची पोस्ट चर्चेत

Panjim Protest Controversy: कार्यालयात कोणीच नसताना तिथे घोषणाबाजी केली हा पोरकटपणा आहे. आमच्यात किती दम आहे हे आम्हीही दाखवू शकतो; दामू नाईक.
Arrest the mastermind demand | Former BJP MP latest post
Narendra Sawaikar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेले जीवघेणे हल्ला प्रकरण राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मागणी केली. तसेच, मास्टरमाईंडला शोधून अटक करण्याची मागणी केली. पणजीतील आंदोलनावेळी जमावाने भाजप कार्यालयावर दिलेल्या धडकेवरुन आता भाजप नत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

रामा काणकोणकर यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या विरोधी पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर धडक दिली होती. कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

तसेच, आंदोलनावेळी कार्यावर जाण्याची गरज नव्हती असेही भाजप नेत्यांनी म्हटले. दोन दिवसांत माफी न मागितल्यास योग्य ती कारवाई करणार असल्याचा अल्टीमेट्म भाजपने आप आमदार वेंझी व्हिएगस यांना दिली आहे. तर आता माजी खासदार सावाईकरांनी या घटनेमागील मास्टरमाईंड शोधण्याची मागणी केली आहे.

Arrest the mastermind demand | Former BJP MP latest post
डिकॉस्ता X गावकर! गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी सत्ताधाऱ्यांकडून गणेश गावकर मैदानात

दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी याबाबत फेसबुकवर एक पोस्ट लिहली आहे. "भाजप कार्यालयावर हल्ला करण्यामागे असणाऱ्या मास्टरमाईंडला देखील अटक करा", अशी पोस्ट सावईकरांनी लिहली आहे.

रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी कुख्‍यात गुंड जेनिटो कार्दोज याला अटक करण्यात आली आहे. तोच या हल्ल्यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर सावईकरांनी ही पोस्ट लिहलीय.

Arrest the mastermind demand | Former BJP MP latest post
Rama Kankonkar: ‘पुरावा नाही’, ‘साक्षीदार फिरले’ हेच पुन्हा ऐकावे लागणार का? 'जेनिटो' यावेळीही सुटणार का?

आंदोलकांनी भाजप कार्यालयावर धडक दिल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी याप्रकरणी भाष्य करताना, राजकाण कुठे, मुद्दा कुठे याचे भान असायला हवं. कार्यालयात कोणीच नसताना तिथे घोषणाबाजी केली हा पोरकटपणा आहे. आमच्यात किती दम आहे हे आम्हीही दाखवू शकतो. पण, आम्ही तशी भाषा केव्हाच वापरली नाही, असे दामू नाईक म्हणाले.

वेंझी यांनी जी भाषा वापरली ती चुकीची आहे. तिसऱ्या मजल्यावर ते कशासाठी आले होते. चणे खाण्यासाठी का बेल वाजविण्यासाठी, त्यांची वक्तव्यही तपासून बघा, असे दामू म्हणाले. दरम्यान, मालमत्तेत बेकायदेशीपणे प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करायचा का नाही, याबाबत विचार सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com