Arpora Nightclub Fire: क्लबच्या तीन कर्मचाऱ्यांच्या जामिनावरील सुनावणी तहकूब, अंतरिम जामिनावर मंगळवारी, तर मुख्य अर्जावर 28 रोजी सुनावणी

Arpora Nightclub Fire Update: हडफडे येथील बर्च नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीप्रकरणी हणजूण पोलिसांनी अटक केलेल्या तीन क्लब कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब केली.
Arpora Nightclub Fire:
Arpora Nightclub Fire:Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी, हडफडे येथील बर्च नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीप्रकरणी हणजूण पोलिसांनी अटक केलेल्या तीन क्लब कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब केली. तसेच अंतरिम जामीन अर्जावरील आदेशासाठी उद्या मंगळवारी (ता. १६) तारीख निश्चित केली. दरम्यान, न्यायालयाने मुख्य जामीन अर्जावर सरकारी पक्षाच्या युक्तिवादासाठी १८ डिसेंबर रोजी, सुनावणी निश्चित केली आहे.

सोमवारी संशयित विवेक सिंग, प्रियांशू ठाकूर आणि राजवीर सिंघानिया या तीन क्लब कर्मचाऱ्यांनी म्हापसा न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. ज्यात सरकारी वकिलांनी उत्तर दाखल करत युक्तिवादासाठी वेळ मागितला.

त्यांनी कारण दिले की, तपास अधिकारी असलेले पोलिस निरीक्षक सध्याच्या प्रकरणाच्या तपासात व्यस्त असल्याने खटल्याच्या कागदपत्रांसह सुनावणीला उपस्थित राहू शकत नाहीत. तसेच, सरकारी वकिलांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत एक संघ म्हणून या प्रकरणावर चर्चा करायची असल्यानेही वेळ मागितला.

Arpora Nightclub Fire:
Goa Winter Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला, पुढील काही दिवस कसं असेल हवामान? वाचा

दरम्यान, संशयित आरोपींचे वकील ॲड. विनायक पोरोब यांनी वेळ देण्यास आक्षेप घेतला आणि आपले युक्तिवाद सादर करून तीनही संशयित आरोपींसाठी अंतरिम जामिनाची विनंती केली. ॲड. पोरोब यांनी युक्तिवाद करताना अंतरिम दिलासा देण्याबाबतच्या अलीकडील आदेशाचा संदर्भ दिला.

त्यांनी ''बर्च'' क्लबच्या तीन कर्मचाऱ्यांची अटक ही बेकायदेशीर असल्याच्या कारणास्तव अंतरिम जामिनाची मागणी केली. तर सरकारी वकील सांतामारिया यांनी अंतरिम जामीन देण्यास आक्षेप घेतला आणि या प्रकरणात निष्पाप २५ लोकांचा जीव गेल्याचे त्यांनी सांगितले.

Arpora Nightclub Fire:
Goa Accident: पणजीहून वेर्णाकडे जाताना काळाचा घाला! कुठ्ठाळी उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात, आसामच्या दोघांचा मृत्यू

दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने सरकारी पक्षाला गुणवत्तेवर युक्तिवाद करण्यासाठी वेळ दिला आणि तपास अधिकाऱ्याला अटकेशी संबंधित कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर, अंतरिम जामिनावरील आदेशासाठी प्रकरण मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com