Arpora: हडफडेचे अपात्र सरपंच, सचिव सापडेनात! 8 दिवस उलटले तरी गायबच; पोलिसांची प्रतिष्‍ठा पणाला

Goa Nightclub Fire: हणजूण पोलिस गेल्या ३० डिसेंबरपासून रेडकर व बागकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करताहेत. परंतु, ते पोलिसांना सापडलेले नाहीत. दोघांनी आपापले मोबाईल संच बंद ठेवले आहेत.
Arpora Nightclub Fire
Arpora Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमधील दुर्घटनाप्रकरणात हडफडे-नागवाचे अपात्र सरपंच रोशन रेडकर तसेच बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दोघांचे हे अर्ज न्यायालयाने फेटाळून आठवडा उलटला तरीही दोघेही अद्याप हणजूण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

६ डिसेंबर २०२५ रोजी बर्च क्लबमध्ये भीषण आग लागली होती. २५ निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात हडफडे-नागवाचे सरपंच रोशन रेडकर व प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केलेले पंचायत सचिव रघुवीर बागकर यांचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यापासून ते दोघेही भूमिगत झाले आहेत.

हणजूण पोलिस गेल्या ३० डिसेंबरपासून रेडकर व बागकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करताहेत. परंतु, ते पोलिसांना सापडलेले नाहीत. दोघांनी आपापले मोबाईल संच बंद ठेवल्याने, तांत्रिकदृष्ट्याही त्यांचा माग काढण्यात पोलिसांना अडचणी येताहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Arpora Nightclub Fire
Goa Nightclub Fire: हडफडेचे पदच्युत सरपंच, सचिवांची पोलिसांच्या हातावर तुरी! जामीन फेटाळल्यानंतर भूमिगत; हायकोर्टात जाण्याची शक्यता

गेल्या ३१ डिसेंबरला, पंचायत संचालनालयाने रोशन रेडकर यांचे सरपंचपद तसेच पंच सदस्यत्वही रद्द केले होते. तर पंचायत सचिव रघुवीर बागकर यांना सरकारी सेवेतून बडतर्फ केले होते. सध्या पोलिस दोघांच्याही घरी दिवसरात्र टेहळणी करत आहेत. परंतु दोघांचाही थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही.

Arpora Nightclub Fire
Arpora Nightclub Fire: बेकायदा नाईटक्लबवर कारवाई न करणं पडलं महागात, हडफडे पंचायतीच्या सचिवाची सेवेतून केली हकालपट्टी; गोवा सरकारचा मोठा दणका

तपासाविषयी माहिती नाही!

बर्च क्लबमधील अग्नितांडवाला जबाबदार धरत हणजूण पोलिसांनी संशयितांपैकी सुरिंदर कुमार खोसला (ब्रिटीश नॅशनल) यांच्याविरुद्ध सर्वात आधी एलओसी म्हणजे लुक-आऊट सर्क्युलर जारी केले होते.

संशयित सुरिंदर कुमार खोसला बर्च क्लबस्थित असलेल्या मालमत्तेचा मालक आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

परंतु त्यानंतर याप्रकरणी तपास कुठवर आलाय किंवा तपासात नवीन अपडेट काय, याविषयी पोलिसांकडून आवश्यक माहिती अद्याप पुरविली गेलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com