Arpora Nightclub Fire: हडफडे दुर्घटनाप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे 2 बडे अधिकारी निलंबित; दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

Suspends 2 GSPCB Officials Over Arpora Fire: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' या रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणाचे पडसाद आता प्रशासकीय पातळीवर उमटू लागले आहेत.
Chief Minister Dr. Pramod Sawant
Chief Minister Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' या रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणाचे पडसाद आता प्रशासकीय पातळीवर उमटू लागले आहेत. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (GSPCB) आपल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी स्वतः या कारवाईची पुष्टी केली असून इतर संबंधित विभागांतील दोषी अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

नेमकी कारवाई काय?

मंगळवारी (30 डिसेंबर) गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वैज्ञानिक सहाय्यक चैतन्य साळगावकर आणि कनिष्ठ पर्यावरण अभियंता विजय हरिचंद्र काणसेकर या दोघांना निलंबित करण्याचे आदेश जारी केला. हडफडे येथील संबंधित रेस्टॉरंटची योग्य पद्धतीने तपासणी न केल्याचा आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला. आगीच्या घटनेनंतर झालेल्या प्राथमिक तपासात या अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचे योग्य पालन केले नसल्याचेही समोर आले.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Arpora Nightclub Fire: पोलीस कोठडी संपली, आता न्यायालयीन कोठडी; म्हापसा कोर्टाचा लुथरा बंधूंना झटका, 9 जानेवारीपर्यंत राहावं लागणार गजाआड

मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा

बुधवारी (31 डिसेंबर) माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, "प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून इतर कोणत्याही संबंधित विभागातील अधिकारी दोषी आढळल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल आणि त्यांनाही निलंबित केले जाईल." सायंकाळपर्यंत या संदर्भात सविस्तर प्रसिद्धीपत्रक जारी केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Arpora Nightclub Fire: 25 जीव जळाले, पण मालक मिळेना! हडफडे नाईट क्लब अग्निकांडाचा 'सस्पेन्स' वाढला; संशयितांची जबाबदारी झटकण्यासाठी पळापळ

तपासणीतील त्रुटी भोवल्या

हडफडे (Arpora) येथील त्या रेस्टॉरंटमध्ये आगीची दुर्घटना घडली तेव्हा सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे चित्र समोर आले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या अधिकाऱ्यांनी त्या जागेची पाहणी करताना तांत्रिक त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जर वेळेत आणि काटेकोरपणे तपासणी झाली असती, तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती, असा सूर सध्या उमटत आहे. या कारवाईमुळे सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रकरणात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने आगामी काळात आणखी काही मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com