Hospice building
Hospice buildingGomantak Digital News

Goa News : जुन्या हॉस्पिसियो इमारतीत जागा द्या !

आरोग्य सेवा केंद्र सुरू करणार : 'होली स्पिरिट` सोसायटीची मागणी
Published on

सासष्टी : जुन्या हॉस्पिसियो इमारतीतील सर्व आरोग्य सेवा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात हलविल्यानंतर १५० वर्षांपूर्वीची ही ऐतिहासिक इमारत ओसाड पडली आहे. ही इमारत वापराविना असल्यामुळे या इमारतीतील थोडी जागा आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यासाठी द्यावी, अशी मागणी होली स्पिरीट चर्चच्या आर्किडिओसीस ऑफ गोवा दमणने आरोग्य खात्याला पत्र लिहून केली आहे. ही माहिती आज पत्रकार परिषदेत सल्लागार समितीतर्फे सावियो कुतिन्हो, आलेशियो पाशेको, मॅकन्झी कॉस्ता, मारियादो कार्मो व सांतान रॉड्रिग्स यांनी दिली.

१८६७ साली म्हणजे बरोबर १५६ वर्षांपूर्वी मडगावमधील नागरिक फा. आंतोनियो जुवांव द मिरांडा यांनी तेव्हा शहरातील गरीब व आजारी लोकांच्या परिस्थितीचा अंदाज घेत व अभ्यास करून हॉस्पिसियो संकल्पना सुरू केली. त्यात अनेक आरोग्य सेवा द्यायला सुरवात केली होती. पोर्तुगिजांच्या राजवटीत व नंतर गोवा मुक्त झाल्यावरही या हॉस्पिसियोत लोकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध होती. तेव्हा हॉस्पिसियो ट्रस्टद्वारे चालविले जात होते.

नंतर ट्रस्टला येथील प्रशासनाचा बोझा चालविणे कठीण होऊन बसले व गोवा सरकारने हॉस्पिसियो आपल्या ताब्यात घेतले. आता अंबाजी येथे नवीन प्रशस्त व सर्व आरोग्य सेवायुक्त असे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सुरू केल्याने हॉस्पिसियोतील सर्व सेवा तिथे हलविण्यात आल्या व हॉस्पिसियो इमारत ओसाड पडली आहे. ही माहिती होली स्पिरिट चर्चचे धर्मोपदेशक फा. आमांदिओ वालादारीस यांनी दिली.

Hospice building
Akanksha Dubay Suicide : अभिनेत्री आकांक्षा दुबेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला...पोलिस लवकरच अटक करणार या व्यक्तीला...

सरकार निर्णय घेईल

आरोग्य खात्याला हॉस्पिसियोसंदर्भातील आर्किडिओसीसचा प्रस्ताव मिळाला आहे. मात्र, यावर सरकार काय तो निर्णय घेईल, असे खात्याच्या संचालिका गीता काकोडे यांनी सांगितले.

Hospice building
Navelim-Cuncolim Road: नावेली-कुंकळ्ळी मार्गाचे रुंदीकरण केले जाणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

सरकारने या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता द्यावी, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेणे शक्य होईल. हॉस्पिसियो इमारतीतील कुठली जागा आरोग्य सेवा केंद्रासाठी द्यावी त्याची रेखाकृती तयार असून सरकारी मान्यता मिळाल्यावर ती सादर केली जाईल.

सावियो कुतिन्हो, सल्लागार समिती सदस्य

आम्ही आरोग्य केंद्रासाठी दिलेल्या जागेची देखभाल योग्यप्रकारे करू व हे आरोग्य केंद्र केवळ एका समाजासाठी नसून संपूर्ण गोव्यातील कुठल्याही जात, पंथ, धर्मातील रुग्णांसाठी असेल. शिवाय गरजू व गरिबांसाठी खास व संबंधित सेवा उपलब्ध करू.

आलेशियो पाशेको, सल्लागार समिती सदस्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com