Goa Crime: सशस्त्र दरोड्याचा डाव फसला; तीन पिस्तुलांसह ११ काडतुसे जप्त

Margao Theft: बेत फसल्यानंतर हुबळीला जाणाऱ्या दरोडेखोरांपैकी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश
Margao Theft: बेत फसल्यानंतर हुबळीला जाणाऱ्या दरोडेखोरांपैकी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश
Margao Thieves Arrested by Kolem Police Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मडगाव शहरातील एका प्रसिद्ध दागिन्यांच्या दुकानावर सशस्त्र दरोडा घालण्याचा बेत फसल्यानंतर हुबळीला जाणाऱ्या दरोडेखोरांपैकी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तुले तसेच ११ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाची माहिती राज्यभरात पसरताच खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एकाला कुळे पोलिसांनी, तर दोघांना रामनगर (कर्नाटक) पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले तिघेही मूळ राजस्थानचे असून त्यांचे इतर साथीदार या तिघांना अटक झाल्याचे कळताच फरार झाले आहेत.

मडगावातील दरोड्याचा प्लॅन फसल्यानंतर गोव्यातून निघून जात असताना गोवर्धनसिंग राजपुरोहित आणि श्‍यामलाल नेगनाळ या दोघांना अनमोड येथे रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांकडे प्रत्येकी एक पिस्तूल

आणि एकूण ८ काडतुसे सापडली आहेत, तर लाडू काका सिंग (वय २२ वर्षे) याला मोले चेकनाक्यावर कुळे पोलिसांनी अटक केली आहे. संशयित लाडू याला कुळे पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीचा रिमांड बजावण्यात आला आहे.

त्याच्याकडे एक पिस्तूल व ३ काडतुसे सापडली आहेत. हे तिघेही गोव्यात आले होते. त्यामुळे रामनगर पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर गोवर्धनसिंग आणि श्‍यामलाल यांना गोव्यात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार असल्याची अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

असा आखला प्लॅन

दरोडेखोरांनी मडगावातील दागिन्यांचे दुकान लक्ष्य ठरविले होते. या दुकानात लोकांची गर्दी केव्हा असते, याची माहितीही त्यांनी मिळवली होती. मात्र, लोकांची वर्दळ कायम असल्याने तेथे शिरकाव करणे शक्य नसल्याने त्यांनी अखेर बेत बदलला.

...म्हणून बळावला संशय

संशयितांची अनमोड आणि मोले चेकनाक्यावर तपासणी करण्यात आली असता, त्यांच्याकडे पिस्तूल आणि काडतुसे सापडली. शिवाय त्यांच्याकडे या शस्त्रांचा परवाना नव्हता. तसेच ते ही शस्त्रे त्यांनी कोठून आणली आणि ते कोठे घेऊन जात होते, याची चौकशी केली असता, ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी तोंड उघडले.

Margao Theft: बेत फसल्यानंतर हुबळीला जाणाऱ्या दरोडेखोरांपैकी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश
Goa Crime: चोरट्यांनी पोलिसांच्या हातावर दिली तुरी, स्टेशनच्या खिडकीतून काढला पळ

दुकानांची केली रेकी

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा हे सॉफ्ट टार्गेट असल्याने या तिघा संशयितांसह आणखी काही साथीदार दिवसाढवळ्या मडगावातील दागिन्यांच्या दुकानांवर दरोडा घालण्यासाठी ते तीन दिवसांपूर्वी गोव्यात आले होते आणि वास्तव्य करून होते. मडगावातील अनेक दागिन्यांच्या दुकानांची त्यांनी रेकी केली होती. मात्र, ही दागिन्यांची दुकाने गजबजलेल्या ठिकाणी तसेच लोकांची नेहमी वर्दळ असलेल्या जागी असल्याने मडगाव शहरात दिवसाढवळ्या त्यांना त्यांचे लक्ष्य साधणे शक्य झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com