7 वर्ष प्रेम, दोन मुलं अन् आता लग्न! प्रसिध्द अभिनेत्यानं गोव्यात गुपचूप उरकलं लग्न, जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत बांधली लग्नगाठ

Arjun Rampal marries Gabriella Demetriades: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या आयुष्यात अखेर एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.
Arjun Rampal marries Gabriella Demetriades
Arjun Rampal marries Gabriella DemetriadesDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या आयुष्यात अखेर एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. 53व्या वर्षी अर्जुनने आपली दीर्घकाळची पार्टनर, मॉडेल आणि फॅशन डिझायनर गॅब्रिएला डेमेट्रिएडिससोबत विवाह केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. विशेष म्हणजे लग्नाआधीच या दोघांनी आपल्या कुटुंबाचा विस्तार केला होता आणि ते दोन मुलांचे पालक आहेत. आता गोव्यात विवाहाची कायदेशीर नोंदणी केल्यानंतर अर्जुन आणि गॅब्रिएला अधिकृतपणे पती-पत्नी झाले आहेत.

2018 पासून एकत्र, आता नात्याला मिळाली कायदेशीर मान्यता

अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला यांचे नाते 2018 पासून सुरू आहे. दोघांनीही त्यांचं नातं लपवून ठेवलं नाही. सार्वजनिक कार्यक्रमांपासून सोशल मीडिया पोस्टपर्यंत दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. कालांतराने त्यांच्यातील नातं अधिक घट्ट होत गेलं आणि त्यांनी कुटुंब सुरू करण्याचा निर्णय घेतला.

गोव्यातील बार्देश सब-रजिस्ट्रार कार्यालयात विवाहाची नोंदणी केल्यानंतर त्यांच्या सहा वर्षांहून अधिक काळाच्या नात्याला आता अधिकृत स्वरूप मिळालं आहे. त्यामुळे अर्जुन आणि गॅब्रिएलाच्या चाहत्यांसाठीही ही बातमी विशेष ठरली आहे.

लग्नाआधीच दोन मुलांचे झाले होते पालक

अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी लग्नाआधीच पालकत्वाचा अनुभव घेतला. या जोडप्याला दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा एरिकचा जन्म 2019 मध्ये झाला, तर दुसरा मुलगा अरव 2023 मध्ये जन्माला आला. दोघेही आपल्या मुलांसोबत वेळ घालवताना अनेकदा दिसतात.

गॅब्रिएला ही दक्षिण आफ्रिकेची मॉडेल असून फॅशन डिझायनर म्हणूनही ती कार्यरत आहे. आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच ती मातृत्वाची जबाबदारीही पार पाडत आहे. अर्जुन आणि गॅब्रिएला दोघेही आपल्या कुटुंबाबाबत कायमच चर्चेत राहिले आहेत.

Arjun Rampal marries Gabriella Demetriades
Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये उघडलं होतं एंगेजमेंटचं गुपित

अर्जुन आणि गॅब्रिएलाने लग्नापूर्वीच साखरपुडा झाल्याची माहिती दिली होती. रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये दोघे सहभागी झाले होते. या संभाषणादरम्यान प्रेम, नातेसंबंध आणि पालकत्वावर चर्चा झाली होती.

गॅब्रिएलाने प्रेमाबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर अर्जुनने त्यांच्या नात्याबद्दल बोलताना सुरुवातीला गॅब्रिएलाच्या सौंदर्याकडे आकर्षित झाल्याचं मजेशीरपणे सांगितलं. मात्र, पुढे हे नातं केवळ आकर्षणापुरतं मर्यादित नसून त्यामध्ये भावनिक जोड आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी असल्याची जाणीव झाल्याचं त्याने सांगितलं. दोघे अद्याप विवाहित नसल्याचं गॅब्रिएलाने सांगितल्यानंतर अर्जुनने आपण एंगेज्ड असल्याचा खुलासा केला होता. त्याच्या या वक्तव्याने रिया चक्रवर्तीही आश्चर्यचकित झाली होती.

मेहर जेसियासोबत झालं होतं पहिलं लग्न

अर्जुन रामपालचं हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी त्याने माजी सुपरमॉडेल आणि उद्योजिका मेहर जेसियासोबत 1998 मध्ये लग्न केलं होतं. या विवाहातून अर्जुनला माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत.

दीर्घकाळ संसार केल्यानंतर अर्जुन आणि मेहर यांनी 2018 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही हा निर्णय परस्पर संमतीने घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. 2019 मध्ये त्यांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली.

Arjun Rampal marries Gabriella Demetriades
Goa BJP: भाजपचे निवडणूक रणशिंग, मुख्यमंत्र्यांनी तपासले मंत्र्यांचे साडेचार वर्षांतील विकासकामांचे प्रगतिपुस्तक

घटस्फोटानंतरही मुलांसाठी कायम एकत्र

अर्जुन आणि मेहर यांचं वैवाहिक नातं संपलं असलं तरी मुलींच्या संगोपनाची जबाबदारी दोघेही मिळून पार पाडतात. दोघांमध्ये मुलांसाठी चांगला समन्वय कायम असल्याचं अर्जुनने अनेकदा सांगितलं आहे. आता गॅब्रिएलासोबतच्या लग्नामुळे अर्जुनच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com