राजीनामा फेटाळण्याच्या निर्णयाला अर्जूनकडून न्यायालयात आव्हान

वेळीप (Arjun Velip) यांनी आज ही आव्हान याचिका दाखल केली असून आपल्या राजीनाम्याची मागणी अन्यायकारकरित्या फेटाळून लावल्याचा दावा त्यांनी या अर्जात केला होता.
कवळेकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन वेळीप (Arjun Velip) यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले आहे.
कवळेकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन वेळीप (Arjun Velip) यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Deputy Chief Minister Babu Kavalekar) यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी आपल्या सरकारी नोकरीचा दिलेला राजीनामा पंचायत संचालकांनी फेटाळून लावल्याने कवळेकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन वेळीप (Arjun Velip) यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले आहे.

कवळेकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन वेळीप (Arjun Velip) यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले आहे.
पेडणे तालुक्यासाठी रवींद्र भवनसाठी जागा निश्चित; उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

वेळीप यांनी आज ही आव्हान याचिका दाखल केली असून आपल्या राजीनाम्याची मागणी अन्यायकारकरित्या फेटाळून लावल्याचा दावा त्यांनी या अर्जात केला होता.

कवळेकर यांचे स्वीय सहाय्यक असलेले वेळीप हे पंचायत सचिव म्हणून काम करत होते. कवळेकर यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याच्या इराद्याने त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र वेळीप यांच्याविरूद्ध दाखल केलेली एक तक्रार दक्षता खात्यासमोर प्रलंबित असल्याचे कारण पुढे करून त्यांचा राजीनामा फेटाळून लावला होता.

आपल्या विरोधात दाखल केलेली तक्रार राजकीय हेतूने प्रेरित होती आणि दक्षता खात्याने केलेल्या चौकशीत त्यात तथ्य नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे आपला राजीनामा त्या कारणावरून फेटाळून लावणे अयोग्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कवळेकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन वेळीप (Arjun Velip) यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले आहे.
ही निवडणूक शेवटची; उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

वेळीप हे पूर्वी बाबू कवळेकर यांच्या खास मर्जीतील म्हणून ओळखले जात होते. पंचायत सचिव असतानाही कवळेकर यांनी त्यांना आपले स्वीय सहाय्यक म्हणून कामाला घेतले होते. मात्र तिथे त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी ते काम सोडून पुन्हा सरकारी नोकरी पत्करली होती. त्यानंतर आपल्या नोकरीचा राजीनामा सादर करीत आपण कवळेकर यांच्या विरुद्ध निवडणूक लढविणार हे जाहीर केले होते.

वेळीप यांचा राजीनामा फेटाळून लावल्याने ते अजूनही सरकारी नोकरच आहेत. तरी त्यांनी आपला प्रचार चालूच ठेवला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com