Goa Panchayat: थिवीमध्ये अर्जुन आरोसकर यांनी ठोकली डबल हॅटट्रिक

ग्रामपंचायत निवडणुकीत थिवी ग्रामपंचायतीमधून सलग सहावेळा निवडून येण्याचा विक्रम अर्जुन आरोसकर यांनी केला.
Goa Panchayat Election News
Goa Panchayat Election NewsDainik Gomantak
Published on
Updated on

थिवी: ग्रामपंचायत निवडणुकीत थिवी ग्रामपंचायतीमधून सलग सहावेळा निवडून येण्याचा विक्रम अर्जुन आरोसकर यांनी केला. जरी पक्ष पातळीवर ही निवडणूक झाली नसली तरी छुप्या पद्धतीने सर्व पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. थिवीमध्ये ११ प्रभाग आहेत. थिवी मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आपला पाठिंबा दर्शविलेल्या उमेदवारांपैकी सहा उमेदवार निवडून आल्याने थिवी पंचायत भाजपच्या ताब्यात आल्याचे हळर्णकर म्हणाले.

(Arjun Aroskar made record of being elected six times consecutively from Thivi Gram Panchayat in Gram Panchayat Elections)

Goa Panchayat Election News
Panchayat Election : पंचायत निवडणुकीत एअरहोस्टेससह अनेक नवोदित उमेदवारांचा विजय

प्रभाग १ मधून अर्जुन आरोसकर यांनी ५११ मते घेत प्रतिस्पर्धी विठ्ठल वायंगणकर यांचा ३३८ मतांनी पराभव केला. प्रभाग २ मध्ये मायकल फर्नांडिस यांनी ४३२ मते घेत प्रेमनाथ मावळिंगकर यांचा ३२६ मतांनी पराभव केला. प्रभाग ३ मध्ये सुनीता साळगावकर या फक्त एका मताने विजयी झाल्या. त्यांना १८० मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी संदीप कवठणकर यांना १७९ मते मिळाली. प्रभाग ४ मध्ये शिवदास कांबळी यांनी ३८० मते घेत प्रतिस्पर्धी मानसी देवसेकर यांचा २७१ मतांनी पराभव केला. प्रभाग ५ मध्ये शिवम परब यांनी १०० मते घेत रामा नार्वेकर यांचा ३ मतांनी पराभव केला. प्रभाग ६ मध्ये गीता शेळके यांनी १३४ मते घेऊन हसिना रेडकर यांचा ३२ मतांनी पराभव केला. प्रभाग ७ मध्ये व्यंकटेश शिरोडकर यांनी १४० मते घेत प्रतिस्पर्धी प्रथमेश मावळींगकर यांचा १५ मतांनी पराभव केला. प्रभाग ८ मधून तुळशीदास शिंदे यांनी २३५ मते घेत जितेंद्र आंबेकर यांचा ९१ मतांनी पराभव केला. प्रभाग ९ मध्ये हर्षता कलंगुटकर यांनी २४२ मते घेत प्रमिला कवठणकर यांना ५६ मतांनी पराभूत केले. प्रभाग १० मध्ये प्रीती विकास आरोलकर यांनी २६५ मते घेत प्रतिस्पर्धी तृप्ती शिंदे यांचा १६७ मतांनी पराभव केला. प्रभाग ११ मध्ये समीक्षा मयेकर यांनी ३२३ मते घेत रिदिशा साळगांवकर यांचा ९९ मतांनी पराभव केला.

विजयी उमेदवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट : निकालानंतर आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी पाठिंबा दिलेल्या विजयी उमेदवारांनी हळर्णकर यांची श्री राम विद्यामंदिरात सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर सर्व उमेदवारांसोबत हळर्णकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com