सर्पदंश प्रतिबंधाचे बनावट औषध बाजारात, 150चे इंजेक्शन विकले दीड हजार रुपयांना; फार्मसीमालकाला नोटीस

Fake snakebite medicine: सर्पदंशावरील प्रतिबंधात्मक बनावट लायोफिलीज्ड औषध विक्रीप्रकरणी तक्रार दाखल झालेल्या आरव फार्मास्युटिकलच्या मालकाला पणजी पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
Fake snakebite medicine
Fake snakebite medicineDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सर्पदंशावरील प्रतिबंधात्मक बनावट लायोफिलीज्ड औषध विक्रीप्रकरणी तक्रार दाखल झालेल्या आरव फार्मास्युटिकलच्या मालकाला पणजी पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

‘गोमन्तक’ला मिळालेल्या माहितीनुसार, पणजी शहर पोलिसांकडे १४ जानेवारी रोजी ‘केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएसशन ऑफ गोवा’ने (सीडीएजी) या फार्मसीविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले होते; परंतु आरोग्य सेवा संचालनालयातील औषध विभागाचे उपसंचालक डॉ. शाहीन सय्यद यांनी आरव फार्मास्युटिकलविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांना त्याची दखल घ्यावी लागली.

पणजी शहर पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, आरव फार्मास्युटिकलने तेलंगणास्थित मूळ औषध उत्पादक कंपनीच्या उत्पादनाविषयी चुकीची माहिती दिली.

बनावट लेबल आणि पॅकेजिंग वापरून ४.९ कोटी रुपयांची खरेदी ऑर्डर आरोग्य सेवा संचालनालयाकडून मिळविली. परंतु पोलिसांकडील तक्रारीत नमूद केले आहे की, त्या कंपनीने 01 AS25007 बॅच क्रमांकाचे इंजेक्शन अँटी-स्नेक व्हेनम (लायोफिलीज्ड) पुरवले होते आणि ते विन्स बायोप्रॉडक्ट्स लिमिटेडने तयार केल्याचा दावा केला होता.

तपासणीत ही लस तथा उत्पादन विन्स बायोप्रॉडक्ट्स लिमिटेडने तयार केली नसल्याचे दिसून आले. विन्स बायोप्रॉडक्ट्स लिमिटेडच्या संमतीशिवाय त्यांच्या लेबल्स आणि पॅकेजिंगप्रति आरव फार्मास्युटिकल्सने वापरल्या आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले.

पणजी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, जे फसवणूक आणि अप्रामाणिक प्रलोभनाशी संबंधित आहे आणि कॉपीराइट कायदा, १९५७ च्या कलम ६३ अंतर्गत कॉपीराईट उल्लंघनाशी संबंधित आहे. अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेल्या कुप्यांचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.

दीडशेचे औषध दीड हजार रुपयांना

सूत्रांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, या फार्मसीचा मालक आपण सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याचे आणि आपली वरपर्यंत पोच असल्याची भीती सर्वांना दाखवतो. यापूर्वीही त्याने आरोग्य खात्याला बाजारात मिळणारे दीडशे रुपयांचे औषध दीड हजार रुपयांना आणि साडेसातशे रुपयांचे औषध साडेचार हजार रुपयांना विकले आहे. त्याविषयीही ‘सीडीएजी’ने आरोग्य अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली होती; परंतु त्याकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

Fake snakebite medicine
Goa Job Fraud: 24 लाख घेतले आणि फसवले! चिखलीतील पतीपत्नीवर गुन्हा दाखल; जहाजावर नोकरी देण्याचे दिले होते आमिष

१०८० औषध कुप्या जप्त

तेलंगणास्थित मूळ औषध उत्पादक कंपनीने केंद्रीय अन्न आणि औषध प्रशासनाकडे (एफडीए) तक्रार केल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, त्यांच्या लेबलचा वापर करून गोव्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाला संशयास्पद अँटी-स्नेक व्हेनम पुरविले. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना आणि राज्य एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त तपासणी केल्यानंतर १०८० औषध कुप्या जप्त केल्या.

Fake snakebite medicine
Goa Land Scam: गोव्यातील बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीचा खेळ खल्लास! SIT च्या धाकाने भूमाफिया पळाले; मुख्यमंत्री सावंतांचा दावा

फार्मसीमालकाचा गॉडफादर कोण?

फसवणूक करण्यात संबंधित फार्मास्युटिकलचा मालक माहीर असून, त्याच्याविरोधात ‘सीडीएजी’ने यापूर्वी आरोग्य सेवा संचालनालयाकडे तक्रारी केल्या. परंतु त्यांची दखल घेतली गेली नाही. दामदुप्पट ते चौपट दराने आरोग्य सेवा संचालनालयाला या फार्मास्युटिकलने औषधे पुरविली होती. ही बाब निदर्शनासही आणून दिली; परंतु राजकीय वरदहस्तामुळे फार्मास्युटिकलच्या मालकाविरोधात कारवाई होत नव्हती. त्यामुळे या फार्मसीमालकाला नक्की कोण वाचवू पाहातो, असा सवाल औषध पुरवठादार विचारत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com