लग्नाच्या धामधुमीत चोराची 'धडाकेबाज' एन्ट्री! पाहुण्यांनी केलेला आहेर लांबवला, 8 तोळे सोन्यासह 20 लाखांची 'हात सफाई'

Goa Theft: लग्नसोहळ्यासारख्या लोकांनी गजबजलेल्या ठिकाणीही त्यांनी ‘हात की सफाई’ बेमालूमपणे चालवली आहे.
Arambol Wedding Theft
Arambol Wedding TheftDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: हल्ली चोर कुठे, कधी, कशी चोरी करतील, हे काहीच सांगता येत नाही. आता लग्नसोहळ्यासारख्या लोकांनी गजबजलेल्या ठिकाणीही त्यांनी ‘हात की सफाई’ बेमालूमपणे चालवली आहे. असाच धक्कादायक प्रकार हरमलातील एका विवाह सोहळ्यात उघडकीस आला.

ऐन विवाह सोहळ्यात अहेराचा मौल्यवान ऐवज असलेली बॅग घेऊन चोराने पोबारा केला आणि या आनंदाच्या सोहळ्यावर दु:खाचे सावट पडले. त्या बॅगेमध्ये सुमारे ८ तोळ्यांचा सोन्याचा हार, अंगठी, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तूंचा अहेर मिळून अंदाजे २० लाखांचा ऐवज होता. दुर्दैवाने लग्नसोहळा सुरू असलेल्या हॉलमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने हा प्रकार उघडकीस आला नाही. मात्र, इतरत्रचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

Arambol Wedding Theft
Goa Unseasonal Rain: वाळपईला अवकाळी पावसासह चक्रीवादळाचा तडाखा, झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड; घरांवर झाडे कोसळून लाखोंचे नुकसान

सविस्तर माहिती अशी, की हरमल येथे एका कुटुंबातील लग्नसोहळ्यात हा धक्कादायक प्रकार घडला. दुपारी भोजन तसेच स्वागत समारंभही झाला. नंतर वधू-वरांसोबत फोटोसेशन सुरू होते. यावेळी अहेर सांभाळणारी वराकडील व्यक्ती बॅग खुर्चीवर ठेवून फोटोसाठी सज्ज झाली आणि डोळ्यांचे पाते लवते न लवते, तोच अचानक एकजण तेथे येऊन त्याने बॅग घेऊन पोबारा केला.

विशेष म्हणजे, कोणाच्या लक्षात हा प्रकार आला नाही आणि ज्यावेळी अहेराची बॅग गायब झाल्याचे लक्षात आले, तेव्हा धावाधाव सुरू झाली. सीसीटीव्ही कॅमेरे पाहून चोराला पकडण्याचा प्रयत्न झाला. सरतेशेवटी फुटेज मिळाले. मात्र, ते चित्र बरेच पुसट असल्याने तपासात अडचणी येत आहेत.

Arambol Wedding Theft
Goa Road Accident: दुचाकींच्या धडकेत दोघेजण ठार, बागा येथील दुर्घटनेत अन्य दोघे जखमी; कामावरून घरी परतताना घाला

दोघे संशयित रडारवर : संबंधितांनी मांद्रे पोलिसांना पाचारण करून चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाती काहीच लागू शकले नाही. नेपाळी इसमासारखी दिसणारी एक व्यक्ती हॉलमध्ये चांगल्या पेहरावात वावरत होती. बाहेर दुचाकी घेऊन थांबलेला त्याचा साथीदार किंचितसा गबाळा होता, अशी माहिती मिळाली. याप्रकरणी वराकडील मंडळींनी पोलिसांत तक्रार नोंदविली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com