Arambol: हरमल पंचायत मंडळ देणार सामूहिक राजीनामा! रस्ता रुंदीकरणावरुन गोंधळ; पिढीजात घरे, दुकाने वाचवण्यासाठी घेतला निर्णय

Arambol Panchayat: : पंचायत क्षेत्रातील एमडीआर १७ व १८ साठी रस्त्याच्या २५ मीटर व ५ मीटर रुंदीकरणाबाबत पंचायत मंडळाकडे आराखडा वगैरे नसल्याने काहीही करणे शक्य नाही.
Resignantion News
Resignantion Dainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: पंचायत क्षेत्रातील एमडीआर १७ व १८ साठी रस्त्याच्या २५ मीटर व ५ मीटर रुंदीकरणाबाबत पंचायत मंडळाकडे आराखडा वगैरे नसल्याने काहीही करणे शक्य नाही. ग्रामस्थांच्या पाठीशी पंचायत ठाम असून प्रसंगी सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा पंचायत मंडळाने खास बैठकीत जाहीर केला. या बैठकीस अंदाजे ३०० ग्रामस्थ उपस्थित होते.

गावातील जुनी पिढीजात घरे व चरितार्थासाठी अस्थापने असणाऱ्या ग्रामस्थांच्या पाठीशी राहणार असून अपात्र ठरविले तरीही पर्वा नाही, असे सरपंच अनुपमा मयेकर व अन्य पंचसदस्यांनी सांगताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून पंचायत मंडळाचे अभिनंदन केले.

Resignantion News
Arambol: काजू-आंबा पीक संकटात? शेतकऱ्यांना धास्ती; हरमल भागात धुक्यामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता

गेल्या ग्रामसभेत या प्रश्नावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता व खात्याच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्याची मागणी केली होती. मात्र, खात्याने अधिकारीवर्ग पाठवू शकत नसल्याचे कारण पुढे करीत, सरपंचांना लेखी कळविले.

Resignantion News
Arambol: बंधारा फुटल्याने खारे पाणी घुसून शेतीचे नुकसान! आश्‍वासनांचा पाऊस; नुकसान भरपाई नाही; शेतकरी हवालदिल

या गावात रस्त्यानजीक असलेली घरे व आस्थापने कायदेशीर की बेकायदेशीर कोण ठरवणार व त्यासाठी नियमावली काय आहे, त्याचा आरखडा खात्याने पाठवला आहे का, अशी विचारणा केली असता, तशी कोणतीच कागदपत्रे पाठविली नसल्याचे पंचायत सचिव सुभाष कांबळी यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी एकच आवाजात कागदपत्रांची मागणी करून आवाज उठवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com